आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्याच्या नावाखाली स्कूल गेम्स आॅफ फेडरेशनने (एसजीएफआय) काेट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फेडरेशनच्या माजी महासचिवाने बनावट पॅन कार्ड आणि खाते क्रमांकाद्वारे ही फसवणूक केली आहे. या माध्यमातून केंद्रीय क्रीडा मंत्रालयासह देशातील विविध राज्यांच्या क्रीडा विभागांना काेट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाखांनी फसवणूक झाली आहे. एसजीएफआयची २००९ मध्ये धार्मिक संस्था म्हणून आग्रा येथे नाेंदणी झालेली आहे. मात्र, याच फेडरेशनच्या खात्यावर काेट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार झालेले आहेत. यामध्ये खास करून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेल्या लाखाे रुपयांच्या निधींचा समावेश आहे. धार्मिक संस्था म्हणून नोंदणी असताना कोट्यवधींचे व्यवहार झाले असून या घोटाळ्याबाबत सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. स्कूल गेम्स फेडरशेनच्यावतीने दरवर्षी शालेय स्पर्धा भरवल्या जातात.
महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुुजरातच्या क्रीडा विभागांची फसवणूक
दाेन ठिकाणी नाेंदणी, दोन बँक खाती, दोन पॅन कार्ड : स्कूल गेम्स आॅफ फेडरेशनची (एसजीएफआय) धर्मादाय आयुक्तांकडे २००९ मध्ये आग्रा येथे नाेंदणी करण्यात आली. याचे दरवर्षी नूतनीकरण होते. मात्र चार वर्षांपूर्वी फेडरेशनच्या नावे दुसरे पॅन कार्ड काढण्यात आले. दुसऱ्यांदा नोंदणी करण्यात आली. यासाठी एसजीएफआयमधील तत्कालीन महासचिव राजेश मिश्रा व गाैरव दीक्षित यांच्या नावांची नाेंद आहे. त्यानंतर १५ मार्च २०१८ रोजी पुण्याच्या वानवडी येथील एचडीएफसी बँकेत नॅशनल स्कूल गेम्स या नावाने दुसरे खाते काढण्यात आले.
दोन वेळा नोंदणी
१) एसजीएफआय साेसायटी, आग्रा येथे १८६० च्या कायद्यानुसार नोंदणी
- पत्ता : राधा वल्लभ इंटर काॅलेज
- नाेंदणी : १२ जून २००९
- पॅन कार्ड नं. : AAEASO143H
- खाते क्रमांक : 070711100001273 युुनियन बँक आॅफ इंडिया, आग्रा शाखा
२) नॅशनल स्कूल गेम्स नावाने पुन्हा नोंदणी
नाेंदणी : ४ जुलै २०१७
पॅन कार्ड नंबर : AAZCSI1267N
खाते क्रमांक : 50100230368356 - एचडीएफसी बँक, वानवडी, पुणे - हे खाते १५ मार्च २०१८ रोजी उघडण्यात आले.
महासचिव मिश्राचे गैरव्यवहार : दुसरे बँक खाते काढल्याची आम्हाला माहिती नाही. मात्र महासचिव राजेश मिश्राने, आपले कुटुंबीय, मेहुणा आणि मेहुण्याची सून यांच्या मदतीने काेट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. - सुशीलकुमार, अध्यक्ष, एसजीएफआय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.