आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पर्धात्मक परीक्षा आणि पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या ग्रामीण भागातील उमेदवारांना झटपट नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवणारे माेठे रॅकेट परभणी जिल्ह्यात सक्रिय आहे. हेच रॅकेट शासकीय नाेकरीसाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांना थेट स्पोर्ट्््स काेट्यातून पाच टक्के आरक्षणासाठी तीन ते चार लाखांत बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्र विकत आहे. असेच प्रमाणपत्र मिळवलेल्या एका बोगस लाभार्थी व एजंट असलेल्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला. यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. परभणी जिल्ह्यातील साबा आणि गंगाखेडमधील माखणी व पाथरीतील अनेकांनी या ‘बोगस’ रॅकेट योजनेचा लाभ घेतल्याचे या लाभार्थीनेच स्पष्ट केले. पोलिस दलापासून ते इतर शासकीय नोकऱ्यांसाठी काहींनी हीच बोगस प्रमाणपत्रे वापरल्याचेही त्याने स्पष्ट केले. साबातील आठ ते दहा युवक याच प्रमाणपत्राच्या आधारे पाेलिस दलात आहेत.
तीन लाख द्या परभणीत; फाेटाेसेशन नागपुरात : परभणी जिल्ह्यामध्ये पाॅवरलिफ्टिंग, तलवारबाजी अणि बाॅक्सिंग खेळ प्रकारातील राज्य स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त आणि राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठीची प्रमाणपत्रे सहज उपलब्ध हाेत आहेत परभणीमध्ये मागील सहा ते सात वर्षांपासून बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्र विक्रीचे माेठे रॅकेट सक्रिय आहे याच रॅकेटच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात उमेदवारांना तीन ते चार लाख रुपयांत थेट शासकीय नाेकरीवर लागण्याची हमी दिली जाते. यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगत तीन लाख परभणीमध्ये घेतले जातात आणि प्रमाणपत्रासाठीचे फाेटाेसेशन नागपुरात केले जाते. त्यामुळे यासाठी अनेक उमेदवारांनी आतापर्यंत नागपूरची वारी केली आहे. याच ठिकाणी याचे वितरण हाेत असल्याचे दिसते.
संघटना विदर्भात; प्रमाणपत्र परभणीतून : पाॅवरलिफ्टिंग खेळ प्रकारातील संघटनेचे काम हे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीमधून चालवले जाते. शासनाच्या मंजुरीनुसार याच असाेसिएशनचे प्रमाणपत्र शासकीय नाेकरीसाठी ५ टक्के आरक्षणासाठी पात्र ठरते. त्यामुळे २०१६ पूर्वी या संघटनेने आयाेजित केलेल्या स्पर्धेतील सहभागाचे प्रावीण्य प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याचे माेठे रॅकेट हे परभणीतून यासाठी काम करते. संघटना विदर्भात असली तरीही या खेळ प्रकाराची बाेगस प्रमाणपत्रे ही औरंगाबाद आणि परभणीतून देण्यात आली आहेत.
नागपूर, आैरंगाबादेत नेटवर्क
स्पाेर्ट््स काेट्यातून पाच टक्के आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय नाेकरीसाठी प्रमाणपत्राची विक्री केली जाते. यासाठी आैरंगाबादपाठाेपाठ परभणी जिल्ह्यात रॅकेट आहे. याच रॅकेटच्या माध्यमातून ही बाेगस प्रमाणपत्रे माेठ्या संख्येत देण्यात आली आहेत. यामध्ये खास करून तलवारबाजी, पाॅवरलिफ्टिंग आणि बाॅक्सिंगच्या खेळातील प्रमाणपत्रांची विक्री झाली आहे. रॅकेटचे धागेदाेरे हे आैरंगाबाद आणि नागपुरात आहे. याच नेटवर्कच्या माध्यमातून ही विक्री करण्यात आलेली आहे. याच्या आधारे बाेगस उमेदवार हे कृषी, महसूल व सर्वाधिक पाेलिस दलात भरती झालेले आहेत.
पैसे गुंतवून बसलाे; मित्र नाेकरीवर; मी वाट पाहताेय, तुमचे काम हाेईल दिव्य मराठी प्रतिनिधी : मी गुलाबराव बाेलताेय. लग्न ठरले, पण नाेकरी नाही. आता शिक्षक भरतीसाठी प्रमाणपत्र पाहिजे. उमेदवार : मी करून देताे काम. परभणीतून आमच्या ओळखीतून सहज मिळेल. प्रतिनिधी : मला शासकीय नाेकरीसाठी प्रमाणपत्र पाहिजे, लवकर मिळेल का? उमेदवार : मिळेल, फक्त पैसे तयार ठेवा. प्रतिनिधी : कधी मिळेल प्रमाणपत्र ? उमेदवार : मी आता पवार सरांशी बाेलताे. त्यानंतर तुम्हाला लगेच सांगताे. कागदपत्रे तयार ठेवा म्हणजे लवकर मिळू शकते. प्रतिनिधी : मी खेळाडू नाही. मग कसे मिळेल? उमेदवार : चालेल. पैसे द्या. तीन लाखांचा खर्च येईल. पैसे दिले की सगळे हाेते. प्रतिनिधी : काेणत्या खेळाचे मिळेल ? उमेदवार : मी तीन लाखांत तलवारबाजीचे घेतलेले आहे. तुम्हाला पाॅवरलिफ्टिंगचे मिळवून देताे. तसेच बाॅक्सिंगचेही मिळेल. प्रतिनिधी : यासाठी काय करावे लागेल ? उमेदवार : फक्त पैसे द्या. त्यानंतर तुम्हाला एकदा नागपूर येथे जावे लागेल. येथे फाेटाेसेशन अणि व्हिडिओ शूटिंग हाेईल. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. प्रतिनिधी : नाेकरीची हमी आहे का ? उमेदवार : हाे. याच प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या गावातील दहा जण शासकीय नाेकरीवर आहेत. त्यांनीही प्रमाणपत्रे विकत घेतली. त्यामुळे नाेकरीची हमी आहे. फक्त भरती निघू द्या. त्यानंतर तुमचे काम झालेच समजा. त्याची हमी आहे.
तलवारबाजी, बाॅक्सिंग, पाॅवरलिफ्टिंगची प्रमाणपत्रे विकत घेतलेले नाेकरीच्या प्रतीक्षेत
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.