आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुसरा डोस घेतला नाही तर १५ डिसेंबरपासून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी दिला. त्यानंतर ५०० ते दोन हजार रुपयांमध्ये कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अधिक वेगाने कार्यरत झाली. जिन्सी पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ तिघांना अटक केली.
या टोळीत सरकारीच डॉक्टर व नर्स सहभागी असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. शेख रझीऊद्दीन फहीमउद्दीन (२७), डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमउद्दीन (३६, दोघेही रा. दिलरस कॉलनी), अबु बकर अल हमीद हादी अल हमीद (२३, रा. इलियास मशीदजवळ, रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक (२१, रा. गल्ली क्र. ३, गणेश कॉलनी) यांना अटक करण्यात आली. सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदी करून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना काही जण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. केंद्रेंनी उपनिरीक्षक अनंत तांगडे यांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार केले. त्यांनी टोळीतील काहीजणांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्यावर उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख गनी, जफर पठाण, संतोष बमनात, सरिता कुंडारे, जगताप, परदेशी यांनी घेराव घालत डॉक्टर भावंडांसह कामगार अबु बकर, मोहम्मद मुदस्सीर यांना व्यवहार करुन प्रमाणपत्र देताना रंगेहाथ पकडले.
आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक प्रमाणपत्रे दिली
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने औरंगाबादेत ४०० पेक्षा अधिक बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. घाटी रुग्णालयात कार्यरत डॉ. रझीउद्दीन या टोळीचा मास्टरमाइंड होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.