आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सोशल मीडियावर महिलेच्या नावाने मैत्रीचे नाटक करून 19 लाख रुपये उकळले; तक्रारींनतर तीन दिवसांत लागला तपास

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्याचे तीन आरोपी अटकेत

एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फेसबुकवर महिलेच्या बनावट प्रोफाइलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी सुमारे दीड वर्ष संपर्क ठेवला. या काळात वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १९ लाख १४ हजार रुपये उकळले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने पाेलिसांत तक्रार दाखल केली. सायबर पाेलिसांनी तीन दिवसांत तांत्रिक तपास करून तीन आराेपींना अटक केली. विजय तुळजाराम मुंगसे (३०, रा. मस्तगड, जुना जालना), सय्यद अन्सार सय्यद अख्तर (३७, रा. शिस टेकडी, मोरंडी मोहल्ला, जुना जालना) व संतोष विष्णू शिंदे (२१, रा. मस्तगड, जुना जालना) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या तिघांनाही ४ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

जालन्यातून निवृत्त झालेल्या एका वृद्ध व्यक्तीस फेसबुकवरून स्नेहा नामक महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाली. त्यांनी कुठलीही खातरजमा न करता ती स्वीकारली. त्यानंतर महिलेने त्यांच्यासोबत नियमित बोलणे सुरू केले. विश्वासात घेत मैत्रीचे नाटक केले. त्यानंतर २०२० मध्ये पहिल्यांदा आराेपीने अचानक रुग्णालयात जावे लागत असल्याचे सांगत दहा हजार रुपये उसने मागितले. वृद्धानेदेखील तत्काळ दिले. विश्वास जिंकण्यासाठी आराेपीने सुरुवातीला हे दहा हजार रुपये परत केले, पण नंतर मात्र त्या महिलेने वेगवेगळी कारणे सांगत पैसे मागणे सुरूचउर्वरित. पान १०

खुनातील आरोपी मास्टरमाइंड
आरोपींपैकी विजयचे किराणा दुकान असून २०१९ मध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल आहे. जामिनावर सुटल्यानंतर त्याने संतोष व सय्यदसोबत मिळून सायबर भामटेगिरी केली. सय्यद रिक्षाचालक आहे, तर संतोष महाविद्यालयीन शिक्षण घेतो.

बातम्या आणखी आहेत...