आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाँडची गोष्ट:जोखमीपासून संरक्षण करते बॉँड गुंतवणूक ; बाँड गुंतवणुकीचे प्रकार जाणून घ्या

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी जोखमीसह स्थिर आणि खात्रीशीर परताव्यासाठी बाँड्स हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. भारतीय गुंतवणूकदार सरकारी व कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. एनएसईच्या अॅप किंवा बाँड प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करता येते. कूपन मूल्य, परिपक्वता, तरलता व इतर वैशिष्ट्यांवर आधारित बाँडच्या अनेक श्रेणी आहेत. हे सर्व जवळजवळ जोखीममुक्त आहेत.

1.फिक्स्ड रेट बाँड: फिक्स्ड रेट बाँड्स: यात गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीपर्यंत निश्चित रक्कम व्याज मिळते. 2. फ्लोटिंग रेट बाँड: यात बेंचमार्कनुसार व्याजदर बदलतो. हे सहसा सरकारद्वारे जारी केले जातात. 3. महागाईवर आधारित बाँड: समजा १,०००ची फेस व्हॅल्यू असलेला चलनवाढीवर आधारित रोखे खरेदी केले आहेत. एका वर्षानंतर चलनवाढीमुळे जर मुद्दल १,०५० रु. झाले. तर रोखे जारीकर्ता रु. १००० वर व्याज देणार नाही. तर १,००० रुपयांवर व्याज देईल. 4. झीरो कूपन बाँड: असे बाँड्स सवलतीत जारी केले जातात. विशिष्ट कालावधीनंतर बाँडधारकाकडून हे परत विकत घेतले जातात. त्याचा फरक म्हणजे गुंतवणूकदाराची कमाई. 5. परिवर्तनीय बाँड: ते व्याज देते आणि परिपक्वतेवर दर्शनी मूल्य परत मिळवते; परंतु त्याचवेळी ते जारी करणाऱ्या कंपनीद्वारे समभागांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...