आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूस्टर डोस:धूतमध्ये पहिल्या दिवशी 100 जणांना बूस्टर डोस ; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसला पहिल्या दिवशी शनिवारी (१८ जून) चांगला प्रतिसाद मिळाला. १०० जणांनी पैसे देऊन लस घेतल्याची माहिती धूतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली आहे. बूस्टरचा डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण होणे आवश्यक आहे. धूतमध्ये कोविशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळच्या वेळी कुपन पद्धतीने शुल्क भरून लस घ्यावी, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले.

कोरोनाचे नवे ११ रुग्ण जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले. त्यातील ९ औरंगाबाद, तर २ ग्रामीणमधील आहेत. सध्या ४६ जणांवर उपचार सुरू आहेत. ३७ घरी, चार खासगी रुग्णालयात, एक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती मनपाने दिली.

बातम्या आणखी आहेत...