आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:राज्यात आतापर्यंत 4.36 टक्के नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस; 94% ज्येष्ठांचे लसीकरण

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल, लसीची दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाणही राज्यात सर्वाधिक

महाराष्ट्राच्या एकूण १२ कोटी आठ लाख लोकसंख्येपैकी २ कोटी ६४ लाख ६६ हजार २८८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४ जून अखेर २०.६२ टक्के नागरिकांनी लसीची एक किंवा दोन मात्रा घेतल्या आहेत. यात लसीची एक मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या २ कोटी ११ लाख ९१ हजार २१० एवढी आहे. तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची संख्या ५२ लाख ७५ हजार ७८ एवढी आहे. याचाच अर्थ आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या ४.३६ टक्के नागरिकांनी लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत.

१८ ते ४४ वयोगटातील 11%नी घेतली लस
राज्यात १८ ते ४५ या वयोगटाची एकूण लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख इतकी आहे. त्यापैकी ६० लाख ९० हजार ९३ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. या गटातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १०. ६६ टक्के एवढे आहे. राज्यात ६० हून अधिक वय असलेली एकूण लोकसंख्या १ कोटी ११ लाख ६ हजार ९३५ आहे (२०११च्या जनगणनेनुसार). त्यापैकी १ कोटी ४ लाख ८४ हजार १९० जणांचे लसीकरण झालेले आहे. म्हणजेच ६० हून जास्त वयोगटातील ९४.३९ टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

बातम्या आणखी आहेत...