आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM ची दोन्ही मते शिवसेनेला:खा. इम्तियाज जलील यांची माहिती; म्हणाले - विकासकामांत मदत करण्याच्या अटीवर सहकार्य केले

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एमआयएमने आपली दोन मते दिली, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत. अशात एमआयएम नेमकी कोणाकडे जाणर याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यातच एमआयएमने आपली भूमिका मांडत आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे जाहीर केले.

का केल्या वाटाघाटी?

जलील म्हणाले की, आम्ही उघडपणे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वाटाघाटी केली आहे. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामे खोळंबली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही उघडपणे मतदानाच्या मोबदल्यात विकास कामे करून घेण्यासह वक्फ बोर्डाचे सबलिकरण, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यांच्या मोबदल्यात सौदेबाजी केली. उघडपणे आमचे शिवसेनेसोबत वैचारिक मतभेद आहेत. मात्र, विकासाच्या मुद्यावर वाटाघाटी केल्याचे ते म्हणाले.

राजकीय विचारधारा वेगळी

जलील म्हणाले, शिवसेना व एमआयएम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पक्ष. ते एकमेकांना कसे मदत करतील या विषयी चर्चा होती. परंतु आम्ही आमच्या आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी मदत करण्याच्या शर्तीवर शिवसेनेच्या उमेदवारांना वाटाघाटी करून सौदेबाजी करत समर्थन दिले. मात्र, राजकीय विचारधारा वेगळी असून, ती कायम राहिल असे ते म्हणाले.

आमचे मतभेद आहेत

मतदारसंघातील नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रसारमध्यमांनी शिवसेना व राष्ट्रवादी तसेच कॉग्रेसच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत. ते सत्य आहे.

- इम्तियाज जलील, खासदार

बातम्या आणखी आहेत...