आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:पिंपळदरी शिवारात चारचाकी वाहनासह देशी दारूचे बॉक्स ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण ते पिंपळदरी मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून एका चारचाकी वाहनासह देशी दारूचे बॉक्स जप्त केली आहेत. गुरुवारी ता. ९ पहाटे हा थरार रंगला आहे.

जिल्हयात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आले आहेत. या काळामध्ये सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. याशिवाय आता वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातही संचारबंदी लागू करण्यात आली असून गुरुवार ता. १७ पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

दरम्यान संचार बंदीचा गैरफायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण भागातील रस्त्यांवरून बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक सुरू आहे . या बाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरून उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक शैलेश देशमुख, कर्मचारी पंडित तायडे, दशरथ राठोड, प्रदीप वाघमारे यांच्या पथकाने बुधवारी ता.८ रात्रीपासूनच पिंपळदरी शिवारात सापळा रचला होता. 

आज पहाटे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहान जामगव्हाण येथून भरधाव वेगाने पिंपळदरी मार्गे औंढा कडे जात असल्याचे आढळून आले. यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या वाहनाचा पाठलाग करून त्यास पिंपळदरी येथे पकडले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे ११ बॉक्स आढळून आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने सदरील ११ बॉक्स व बोलेरो जीप जप्त केली आहे. या प्रकरणात संजय भगवान शिंदे या इसमाला ही ताब्यात घेऊन ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागात संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे निरीक्षक नेहूल पुढील तपास करीत आहेत.

0