आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दारूच्या व्यसनाला कंटाळून मुलाने केला वडिलांचा खून, औरंगाबाद जवळील चिंचोली गावात घडली घटना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या व्यसनावरून वडील-मुलात सतत वाद व्हायचे. २ एप्रिल रोजी दोघांत कडाक्याचे भांडण झाले आणि मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात लाेखंडी घन मारून त्यांचा खून केल्याची घटना औरंगाबाद शहराजवळील चिंचोली गावात घडली. कडूबा भावराव घुगे (६५) असे खून झालेल्याचे नाव असून नानासाहेब घुगे (२५, रा. चिंचोली, ता. जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

मृत कडूबा यांची पत्नी संगीताबाई घुगे (५५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांना ३ मुली आणि २ मुले आहेत. तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे. चौथा मुलगा भोळसर स्वभावाचा आहे. तर नानासाहेब लहान मुलगा आहे. शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त तिन्ही मुली आणि नात घरी आले होते. सकाळी सर्वांनी घरावर गुढी उभारली. सायंकाळी कडूबा दारू पिऊन घरी आले. त्यावरून नानासाहेब व कडूबा या बापलेकात वाद झाला. नानासाहेब रागाच्या भरात घराबाहेर निघून गेला. तर कडूबा हे बाहेर बाजेवर झोपी गेले. दरम्यान, रात्री ९.३० वाजता नानासाहेब घरी आला व लोखंडी घन वडिलांच्या डोक्यात घातला. ते जागीच बेशुद्ध पडले. भावालाही त्याने मारहाण केली. दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान कडूबा यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...