आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लज्जास्पद:मुला-मुलींना विवस्त्र एकत्रित अंघोळ घातली; मतिमंद शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापकासह 12 जणांवर गुन्हा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जटवाडा येथील शरदचंद्र पवार निवासी मतिमंद विद्यालयातील मुला-मुलींना एकत्रित विवस्त्र अंघोळ घातल्याचा प्रकार पाच महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी बुधवारी हर्सूल पोलिस ठाण्यात विद्यालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापकांसह बारा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

समाजकल्याण निरीक्षक एस. डी. साळुंके या मार्चमध्ये या शाळेत पाहणीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी शाळेचे प्रवेशद्वार उघडे व सुरक्षा रक्षक हजर नव्हता. तसेच शाळेतील मुला-मुलींना विवस्त्र एकत्र अंघोळ घालण्यात येत हाेती. हे पाहून साळुंके व पथकाला धक्का बसला. त्यांनी याबाबत मुख्याध्यापकाला विचारले असता रोज अशीच अंघोळ घातली जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुख्याध्यापक साजिद बादशहा पटेल, वसतिगृह अधीक्षक योगेश राठोड, काळजीवाहक राजेश महादेव निंबाळकर, मदतनीस शेख जाकीर मंजूर, पहारेकरी संतोष पवार, समितीचे अध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव साजिद पटेल, संस्थाप्रमुख बादशहा पटेल यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, साळुंके यांनी विद्यालयाची पाहणी केली असता विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत काहीही खाण्यास दिलेले नव्हते. अंघोळीसाठी थंड पाणी दिले हाेते. स्वयंपाकघरात धान्य, भाजीपाला नव्हता. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत गाद्या, पांघरूण नव्हते. गतिमंद मुलांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे.