आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमानास्पद:ब्रह्माकुमारीस राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, मराठवाड्यात एका वर्षात दशलक्ष युनीटची वीज बचत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबर 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन' चे औचित्य साधून महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण यांच्या 17 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराचे निकाल घोषित करण्यात आले. औरंगाबाद ब्रह्माकुमारीस विद्यालयाची एनजीओ प्रवर्गात प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी मराठवाड्यात एका वर्षात दशलक्ष युनिट वीज बचतीची किमया साध्य केली.

सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शीला दीदी यांच्या पुढाकाराने ऊर्जा संवर्धन टीमने मराठवाड्यात एका वर्षात दशलक्ष युनिट वीज बचत केली आहे. इंधन संरक्षण कार्यशाळा, प्रदर्शनी, चर्चासत्रे, शालेय चित्रकला स्पर्धा अशा अनेक उपक्रमांमार्फत मराठवाड्यात स्वच्छ इंधनाच्या वापराबाबत जनतेत जनजागृती करण्यात आले होते. भारताची सामूहिकरीत्या स्वच्छ इंधनाकडे वाटचाल होण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सवात ब्रह्माकुमारीस मुख्यालयाच्या समारंभात आवाहन केले होते.

ऊर्जा संरक्षण जनजागृती करिता मराठवाडा विभागात शाळा, महाविद्यालय व औद्योगिक क्षेत्रात कार्यक्रम आयोजित केले होते. ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजयोगिनी ब्रह्माकुमारी शीला दीदीचा लवकरच एका विशेष शासकीय समारंभात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महाऊर्जा आणि ऊर्जा मंत्रालय राज्य सरकार यांच्याकडून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो. ऊर्जा संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्काराबद्धल राजयोगिनी ब्रह्माकुमारी शीला दीदी यांचे मुंबई महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

यावर दिला भर

  • ऊर्जा संवर्धन व्यवस्थापन
  • एलईडी प्रकाश व्यवस्था
  • BLDC फॅन फॅन सिस्टम
  • अक्षय ऊर्जा संयंत्रे
  • प्रेरण स्वयंपाक आणि पीक तास ऊर्जा व्यवस्थापन
बातम्या आणखी आहेत...