आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:पैसे कमावण्याचे ध्येय असेल तर ब्रँडची प्रतिमा मलिन होऊ शकते

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी एका बायकरने रेड सिग्नल तोडले, त्याला पाहून आणखी चार बाइकस्वार आणि एका कारने तेच सिग्नल तोडले. पोलिसाने पहिल्या व्यक्तीला जाऊ दिले, मात्र बाकीच्या पाच जणांची पावती फाडली. पहिल्या व्यक्तीला सोडले आणि आमच्याकडून चलान घेतल्याने ते भडकले. बराच वाद झाल्यानंतर इन्स्पेक्टरने सांगितले, पहिला माणूस त्यांच्या मार्केटिंगचा होता. तुम्ही गेल्यानंतर तो पुन्हा येईल. सिग्नल तोडून आणखी चार-पाच जणांना अडकवेल. ते ऐकून ते पाच लोक स्तब्ध झाले. इन्स्पेक्टर म्हणाला, समजून घ्या, एखाद्या कॉपाेर्रेटप्रमाणे आम्हालाही मार्च एंडिंगचे टार्गेट पूर्ण करायचे असते. तुम्हाला हा एखाद्या व्हॉट्सअॅपचा विनोद वाटत असेल तर मी तुम्हाला २९ मार्च रोजी घडलेली एक सत्य घटना सांगतो.

माझ्या ओळखीचे एक सद्गृहस्थ भोपाळवरून इंदूरला चालले होते. आष्टाच्या आधी ‘अमलाहा’ टोल ओलांडताना त्यांना ओव्हर स्पीडवरून थांबवण्यात आले, मात्र टोल देण्यासाठी त्यांनी स्पीड कमी केली होती. त्यांनी आपल्या गाडीचा वेग किती होता ते सांगितले. त्यावर वाद केला तरीही पोलिस ऐकेनात म्हणून त्यांनी राजकीय संपर्काचा फायदा घेत पोलिस इन्स्पेक्टरच्या हातात फोन दिला. पोलिसांनी फोनवर दुसरीकडे उपस्थित असलेल्या व्यक्तीला शांतपणे उत्तर दिले, मार्च एंडिंगचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भोपाळवरून आलेल्या पोलिस इंटरसेप्टरच्या गाडीने टोलपासून सुमारे ५०० मीटर दूर यांच्या गाडीची नोंद केली आहे. आता यांना दंडाशिवाय जाऊ दिले तर मला माझ्या खिशातून दंड भरावा लागेल. कारण वेगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व कारचे क्रमांक इंटरसेप्टर वाहनात नोंदलेले असतात आणि त्यानुसार जमा झालेल्या पैशाचा हिशेब लावावा लागतो. त्यानंतरही बऱ्याच वादानंतर सर्वांनीच दंड भरला. खरं तर टाेल नाक्यापासून काही अंतरावर एक इंटरसेप्टर वाहन उभे असते. कारण हायवेवर वेगाने येणाऱ्या गाडीला थांबणे अवघड असते. त्यांना माहीत असते की, वेगाने येणारे वाहन टोलवर थांबेल, तेथे दुसरी टीम दंड वसूल करत असते. त्यामुळे अधिकारी दोन ठिकाणी उभे असतात. एक वेग मोजण्यासाठी टोलपासून काही अंतरावर, तर दुसरा इंटरसेप्टर वाहनाकडून माहिती मिळाल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी टोलसमोर पटकन येऊन उभे राहतात. आता याच्या उलट दुसरी परिस्थिती पाहा...

जगातील बऱ्याच ठिकाणी उन्हाळा असतो. तेथे सूर्यास्तानंतर हॉटेल सुरू हाेतात. अमेरिकेत एका क्रिएटिव्ह विचाराच्या हॉटेल मालकाने दिवसा कमाई होत नव्हती म्हणून एक शक्कल लढवली. त्याने हॉटेलबाहेर एक बोर्ड लावला. त्यावर लिहिले..., ‘हसबंड डे केअर सेंटर’. पुढे लिहिले होते, ‘स्वत:साठी वेळ काढा. शॉपिंगला जा. तुमचा पती आमच्याकडे सोडून जा. त्यांना जसे हवे तसे जेवण आम्ही देऊ. त्यांची चांगली देखरेख करू. तुम्हाला फक्त जेवणाचे पैसे द्यावे लागतील.’ त्यानंतर हाॅटेल मालकाची प्रचंड कमाई झाली. नफा मिळवणे वाईट मानले जात नाही, परंतु त्यात चांगल्या गोष्टींचाही समावेश असावा, त्यात काही गोष्टींचे नियमित पालन, सेवांचे वितरण किंवा वस्तूंची देवाणघेवाण असावी.

बातम्या आणखी आहेत...