आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पैठण रोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातर्फे गर्भवती महिला व मातांमध्ये स्तनपान जागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध पोस्टर्सद्वारे विद्यार्थिनींकडून जागृती करण्यात आली.
रॅलीचे उद्घाटन संचालक शाहिद शेख, प्राचार्या डॉ. स्वाती नाखले यांच्या हस्ते झाले. ईटखेडा, कांचनवाडी परिसरातून रॅली काढण्यात आली. स्तनपानाचे महत्त्व, फायदे, पोषण आहाराची माहिती दर्शवणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी चालत होते.
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात पोस्टर्स, निबंध स्पर्धा, रेसिपी स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑगस्ट रोजी ईटखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांना स्तनपानाविषयी आहारतज्ज्ञ माहिती देणार आहेत.सप्ताह यशस्वी करण्यासाठी डॉ. फरहाना खान, डॉ. शीतल पागे, डॉ. सुधाकर राव, गणेश सोनवणे, जावेद पटेल, विशाल गजहंस आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.