आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर सौरभची कबुली:गळा दाबूनही श्वासोच्छ्वास सुरूच; पाय पकडून ओढणीने गळा घोटला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“शहरात एकटी राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंकिताचे वागणे बदलले होते. १४ ऑगस्ट रोजी तिने सोबतच येण्याचा हट्ट केल्याने तिला शिऊर येथे घेऊन जावे लागले. पहाटे पाच वाजता हडकाेतील खोलीवर अाणून सोडले. दोन तास शहरात फिरून पुन्हा खोलीवर जात तिचा दोन्ही हातांनी गळा आवळला. तरीही तिचा श्वास थांबत नव्हता. त्यानंतर मित्र मन्वर उस्मान शहा याने तिचे पाय पकडले आणि मी जवळची ओढणी घेऊन पुन्हा गळा आवळला. तिचा श्वास थांबवल्यावरच बाजूला झालो,’अशी कबुली सौरभने दिली.

शिऊरच्या अंकिता श्रीवास्तव (२४) हिची हत्या केल्याची घटना एन-११, नवजीवन कॉलनीत घडली होती. विवाहित अंकिताचे शेजारी राहणाऱ्या सौरभ बंडू लाखे (३१) याच्यासोबत प्रेमसंबंध हाेते. कुटुंबाने दोन वेळा समजूत घातली. मात्र, त्यांचे संबंध कमी झाले नाहीत. त्यामुळे पती महेशने तिला माहेरी सोडले. अडीच वर्षांच्या मुलीला मात्र त्याने स्वत:कडेच ठेवले. त्याच्या तिसऱ्याच दिवशी अंकिता शिऊरला गेली. सौरभसोबत राहण्याचा हट्ट करू लागली. त्यानंतर ती औरंगाबादमध्ये राहण्यासाठी आली.

सुरुवातीला एका खोलीत राहिली. नंतर तिने खोली बदलण्याचा निर्णय घेतला. सौरभच्या मदतीने डीमार्टसमोरील दुसरी खोली भाड्याने घेतली. त्यानंतर अधूनमधून त्यांच्या भेटी होत होत्या. मात्र, अंकिताच्या वागण्यातील बदल व सतत लग्नाची मागणी सौरभला खटकायला लागली होती.

पहिल्या दिवशी मृतदेह हलवण्याची तयारी हाेती. पण एका वडापाव विक्रेत्याने पाहिल्याने मृतदेह पुन्हा खाेलीत नेऊन ठेवला. १६ ऑगस्ट राेजी गाडी आणून त्यात मृतदेह ठेवला. आमखास मैदानापर्यंत गाडी गेल्यानंतर चालकाला संशय आल्याने त्याने पुढे जाण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा मृतदेह खोलीवर आणला. नंतर गावातील मन्वरकडून चाकू आणून साैरभने मृतदेहाचे तुकडे केले.

अवयव पूर्णपणे कुजले : गुरुवारी रात्रीतून पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सूत्रे हलवली.निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक अशोक अवचार, फॉरेन्सिक विभागाचे तज्ज्ञ, ठसेतज्ज्ञ व दोन पंचांचे पथक त्याच्या गोडाऊनवर दाखल झाले. अंकितचे अवयव पूर्णपणे कुजले होते.

आरोपी सौरभसाठी ना कुटुंब कोर्टात आले, ना कुणी वकील लावला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या पथकाने सौरभ व चालक सुनील गंगाधर धनेश्वर (२५) याला न्यायालयात हजर केले. ३.५० वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. खून करतानाचे कपडे, इतर चौकशी, दुचाकी जप्त करणे, मन्वरचा शोध घेण्यासाठी सलगरकर यांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. दहा मिनिटांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.

प्रचंड जनसंपर्क असलेला, कायम माणसांच्या गर्दीत राहणारा सौरभ गुरुवारी न्यायालयात एकटा पडला. चेहरा शांत हाेता. त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य, मित्र न्यायालयात हजर नव्हते. वकीलही लावला नव्हता. मित्राने ऐनवेळी वकिलाची निवड केली. धनेश्वरचे कुटुंब मात्र मोठ्या तणावात होते.

बातम्या आणखी आहेत...