आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, अवघ्या दोन वर्षांमध्येच महामार्गाची झाली दुर्दशा

वेरूळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणे, कठडे वाहून जाणे, खचून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे आदी प्रकार बघावयास मिळाल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून सांभाळून वाहने चालवावी लागत आहेत.

जांभाळा या गावाजवळील पूल तसेच वेरूळजवळील पूल खचला असून कन्नड जवळील रेल येथील पूल तसेच बायपास जवळील रस्ता खचला आहे. रस्त्यालागत असलेले कठडेदेखील कधीही ढासळू शकतात. औरंगाबाद ते कन्नड दरम्यान असलेले विविध फलक सदोष असून ते बदलावेत, अशी मागणी हाेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातास निमंत्रण देण्याचे काम या खचलेल्या पुलामुळे होत असल्याने याची दखल घेतली असती तर असे प्रश्न निर्माण झाले नसते अशी चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...