आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीव केंद्रशासित प्रदेशात वीस वर्षानंतर भाजपची सत्ता:विजया रहाटकर यांच्या नैतृत्वात जिंकल्या सर्व 13 जागा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वीस वर्षांपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली दीव या केंद्रशासित प्रदेशाची नगरपालिका भाजपच्या केंद्रीय सचिव तथा दीवच्या प्रभारी विजया रहाटकर यांच्या राजकीय कौशल्याने भाजपच्या ताब्यात आली. एकूण 13 पैकी 13 जागा जिंकत भाजपने कॉग्रेसला क्लिन स्वीप दिली. आठ युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली असल्याचे रहाटकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

आपण कधीच कुठली अपेक्षा ठेवून भाजपमध्ये आतापर्यंत काम केले नसल्याचे सांगून, नगरसेवक, महापौर, केंद्रीय महिला मोर्चा प्रमुख, महिला आयोग अद्यक्ष आणि आता पुन्हा केंद्रीय सचिव या पदांपर्यंत मजल मारली. दीवच्या नगराध्यक्षा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवार बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या दीव या केंद्रशासीत बेट महत्वाचे असल्याने मागील दोन वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून विजय संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या केंद्रीय सांसदीय मंडळात साडेसहा वर्षे रहाटकर होत्या. भाजप राष्ट्रीय महिला आघाडीच्या अद्यक्षा ह्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या पदसिद्ध सदस्या असतात. आपण आता संबंधित पदावर नसल्यामुळे सांसदीय मंडळात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरात राज्यासह भाजप केंद्रात सत्तेत असताना केवळ शेजारच्या दीव नगरपालिकेत भाजपला सत्ता मिळत नसल्याची बाब कुठतरी मनात घर करून गेली. आपल्यास जबाबदारी मिळाल्यानंतर पक्षसंघटना बांधणीस प्रारंभ केला. तत्कालिन नगराध्यक्ष कॉग्रेसचे हितेन साेलंकी यांना एका प्रकरणात अटक झाल्यानंतर मतदारांचे डोळे उघडले. त्यानंतर आलेल्या कॉग्रेसच्या उमेदवाराचे निधन झाले. निवडणुकीची घोषणा होताच कॉग्रेसचे काही नगरसेवक भाजपत दाखल झाले.

सहा नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडूण आले. सात जागांवर केवळ निवडणूक झाली. प्रभारी पदाची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष यांनी सोपविली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. दीव येथे कॉग्रेसचे पक्षसंघटन खूप मजबूत होते. समुद्रातील एक टोक दीव असून महत्वाचे आहे. येथील कामकाजाची भाषा गुजराथी आहे. नागरिकांना तत्कालिन नगराध्यक्ष हितेन सर्वकाही देतो असे सांगण्यात आले होते. परंतु, वस्तुस्थिती अशी होती की सर्व काही केंद्राकडून येत होते. नागरिकांना जेव्हा ही बाब पटली तेव्हा त्यांनी सव्रच जागा भाजपच्या झोळीत टाकल्या. या विजयानंतर रहाटकर यांना भाजपने एक महिन्याची सुट्टी दिली असून त्या आपल्या मुलीकडे कॅलिफोर्निया अमेरिकेत येथे सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत. 15 ऑगस्ट रोजी त्यांनी अमेरिकेत झेंडा वंदन करून स्वातंत्र्य दिन साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...