आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणामधील भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) च्या माध्यमातून राज्यात नव्या पक्षाचा प्रवेश झाला आहे. नांदेडच्या सभेतून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची विकासकामे वाचून दाखवत महाराष्ट्रातही जोर लावणार असल्याचे सांगितले होते. राज्यातील माजी आमदार, माजी खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाड्यातील माजी मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे. आगामी काळात विदर्भातून माजी मंत्री आणि बारामतीतूनदेखील काही नेते बीआरएसमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, काही आमदारदेखील संपर्कात असल्याचा दावा बीआरएसकडून केला जात आहे. आता नवतरुणांना घेण्याच्या सूचनादेखील चंद्रशेखर राव यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तेलंगणातील ग्रामीण विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण नेत्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न या पक्षाच्या माध्यमातून केले जात आहेत. महाराष्ट्रात अस्वस्थता, नव्या युवकांना स्थान द्या राज्यात शेती क्षेत्रात अस्वस्थता आहे. त्यामुळे या भागातील नवीन तरुण बीआरएसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना तेलंगणाचा विकास, सिंचनामुळे झालेली प्रगती दाखवून त्याची माहिती त्यांच्यापर्यत पोहोचवण्याच्या सुचना चंद्रशेखर राव यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शेती चळवळीतील लोकांना काम करण्याची संधी बीआरएसने ग्रामीण भागात विकास कसा करता येऊ शकतो, हे तेलंगणात दाखवून दिले आहे. त्यामुळे स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत काम करणाऱ्या लोकांसाठी बीआरएस ही संधी आहे. शेतकरी कामगार चळवळीतील लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे हे आमचे आवाहन आहे. -माणिक कदम, अध्यक्ष, बीआरएस किसान सेल महाराष्ट्र
विदर्भातील माजी मंत्री, बारामतीच्या नेत्यांना पक्षात आणणे सुरू माजी आमदारांना दिले जातेय पक्षात स्थान गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे, हिंगणघाटचे माजी आमदार वसंतराव बोंडे आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आतापर्यत पक्षात प्रवेश केला आहे. तसेच, इतर संघटनांच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंकेंनी भेट घेऊन खळबळ माजवून दिली आहे. विद्यमान आमदारदेखील आमच्या संपर्कात आहेत. विदर्भ आणि बारामतीमधील नेत्यांचादेखील प्रवेश होणार असल्याचे बीआरएसच्या सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.