आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मदतीची घोषणा केवळ भारत राष्ट्रीय समितीच्या (बीआरएस) दबावापोटीच केली आहे. ‘बीआरएस’ने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या योजनेचे स्वागत करते. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्याच्या विकासासाठी तेलंगण मॉडेल अवलंबल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. तेलंगण राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मोफत देण्यात यावे, अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे. बाभळीचा प्रश्न सोडवण्यास तेलंगण सरकार उत्सुक असून राज्य सरकारने प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्रिवेदी यांनी केले. या वेळी भारत राष्ट्रीय समितीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे समन्वयक सोमनाथ थोरात, महाराष्ट्राच्या किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सरचिटणीस त्रिवेदी म्हणाले की, तेलंगणामध्ये सरकार शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत देते. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. आत्महत्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाणी आणि वीज मोफत द्यावी. तेलंगण सरकार प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये अनुदान देते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेदेखील शेतकऱ्यांना मदत केल्यास त्यांना फायदा होईल. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवलेले मॉडेल महाराष्ट्र सरकारनेदेखील राबवावे.
बाभळी प्रकरणात महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याबाबत विचारले असता तेलंगण सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे. मात्र, या प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाला सर्वत्र पाणी पुरवून सुजलाम सुफलाम केले आहे. त्यामुळे बाभळीचा प्रश्नदेखील सहज सुटेल. त्यासाठी कुठलेही राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले.
बाभळी प्रकरणात महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याबाबत विचारले असता तेलंगण सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे. मात्र, या प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाला सर्वत्र पाणी पुरवून सुजलाम सुफलाम केले आहे. त्यामुळे बाभळीचा प्रश्नदेखील सहज सुटेल. त्यासाठी कुठलेही राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले.
निवडणुका लढवणार ‘बीआरएस’ महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. त्यासाठी संघटन मजबूत करण्यात येत आहे, असेही त्रिवेदी यांनी सांगितले. माणिक कदम म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. कापसाचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे, केवळ राजकारण करू नये.
भाजपची सरकारे केवळ कंपनी कॉर्पाेरेटसाठी भाजप सरकार केवळ कंपनी आणि काॅर्पोरेटचे सरकार असल्यासारखे वागत आहे. आयात-निर्यातीच्या यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे कापसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, देशात आता शेतकरी नेते तयार करण्याचे काम ‘बीआरएस’ करणार आहे. देशातील शेतीविषयक धोरणे राबवण्याचे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येणार आहे, असे त्रिवेदी यांनी सांगितले. माणिक कदम म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोणी वालीच राहिला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या केल्या तरी कोणी लक्ष देत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. सरकार घोषणा करते मात्र, त्यासाठी तरतुदी करत नाही. महाराष्ट्र सरकारची पीक विमा योजना फसवी असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.