आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिवृष्टीग्रस्तांची क्रूर थट्टा:मोदी - पंतप्रधान विमा घेण्यास आपण इच्छुक आहात का? शेतकरी - 1100 भरून 1800 मिळत असतील तर नको

नांदेड/ हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुटपुंज्या भरपाईच्या निषेधार्थ आंदोलन करताना डोंगरकडा येथील शेतकरी. - Divya Marathi
तुटपुंज्या भरपाईच्या निषेधार्थ आंदोलन करताना डोंगरकडा येथील शेतकरी.
  • हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे 1800 रुपयांचे चेक मुख्यमंत्र्यांना पाठवले परत

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे फायदे सांगत होते. मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विदारक अनुभव आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना १,१०० रुपयांचा विमा हप्ता भरल्यानंतर सहा महिन्यांनी १८०० रुपयांचे धनादेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त २ शेतकऱ्यांनी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परत पाठवले आहेत. शनिवारी ‌उर्वरित १८ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे धनादेश पाठवणार आहेत. तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील गणेश वाडीतांडा येथील रहिवासी जयसिंग धनसिंग आडे (५६) या शेतकऱ्याने बँकेसह खासगी कर्जाला कंटाळून शुक्रवारी पहाटे विष पिऊन आत्महत्या केली.

एकीकडे शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पीक विमा योजनेचा फायदा तळागाळातील लोकांना होत असल्याचे ठासून सांगितले. विमा घेण्यासाठी गावातील सगळे इच्छुक आहेत का, असा प्रश्न शेतकरी गणेश भोसले यांना विचारला व पीक विमा घेणारे शेतकरी कसे समाधानी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र विपरीत आहे.

विमा कंपनी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात या वर्षी १२४ टक्के पाऊस झाला. सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे पीक विमा कंपनीने किमान ४० ते ४३ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते. मात्र, डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांना हेक्टरी १८०० रुपयांची पीक विम्याची मदत मिळाली आहे. या प्रकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, माधव सावके, दीपक सावके, सूरज सावके, देवबा सावके, कोंडजी सावके, भानुदास सावके, गंगाधर वाबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठून चार तास ठिय्या मांडला होता.

यंदा ३ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

यंदा ३ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. सर्वात जास्त सोयाबीनचा विमा काढला होता. त्यासाठी जुलै महिन्यात हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम कंपनीकडे भरणा केली होती, तर २०० रुपये ऑनलाइन विमा भरण्यासाठी लागले.

बातम्या आणखी आहेत...