आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:गोळीबार अन् तलवारीने वार करत तरुणाचा निर्घृण खून

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात लूटमारीच्या घटना वाढल्या

मुदखेड तालुक्यातील निवघा येथे सोमवारी सकाळी तिघांनी दुचाकीवर येऊन गोळीबार व तलवारीने वार करत तरुणाचा खून केला. तरुणाचा मृतदेह ईजळी शिवारात आढळून आला. देविदास माधवराव पवार (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मुदखेड तालुक्यातील निवघा येथील देविदास हा गावातील शिवाजी चौकाच्या परिसरात असताना विना नंबरच्या दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात मारेकऱ्यांनी देविदासवर गोळी झाडली. त्यानंतर जखमी अवस्थेेत देविदासला दुचाकीवर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन गोळ्या झाडून तलवारीने वार केला. या घटनेत देविदास पवार घटनास्थळी गतप्राण झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारड व मुदखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख, सहायक पोलिस निरिक्षक शिवराज तुगावे, पोलिस उपनिरिक्षक वानोळे यांच्या पथकाने तपास चक्र गतीने चालवत तपासअंती अवघ्या दोन तासात ईजळीत शिवारात देविदासचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, नेमके घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झाले असून उशिरापर्यंत बारड ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.

लूटमारीच्या घटना वाढल्या
जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. नांदेड शहरातील हिंगोली गेट उड्डाण पुलावर चोरट्यांनी भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडून रोख १४ लाख ८० हजार रुपये लंपास केले. त्याच दिवशी लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकास धमकी देवून लुटल्याची घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...