आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची बातमी:12 वीच्या पीसीबी गुणांच्या आधारावर भेटेल बीएसस्सी नर्सिंग प्रवेश; राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने काढले परिपत्रक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिचर्या (परिचारक व परिचारिका) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश पात्रता परीक्षेतील (नीट) गुणांची अट आता रद्द करून बारावीच्या 45 टक्के गुणांवर (पीसीबी ग्रुप आणि इंग्रजी उत्तीर्ण) बी. एसस्सी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कुल अ‍ॅण्ड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनचे राज्यसचिव शंकरराव आडसुळ यांनी केले आहे.

भारतीय परिचर्या परिषदेने परिचर्या (परिचारक व परिचारिका) अभ्यासक्रमासंदर्भात दोन परिपत्रक काढले होते. यात प्रवेश पात्रता परीक्षेतील (नीट) गुणांची अट प्रथमच लागू करण्यात आली होती. भारतीय परिचर्या परिषद यांनी 5 जुलै 2021 रोजीच्या अध्यादेशानसाुर परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीमध्ये पीसीबी गु्रपमध्ये 45 टक्के गुण व इंग्रजी विषयात पात्रता ठरवली होती. तसेच परिचर्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी संबंधित राज्य सरकार किंवा विद्यापीठाने पूर्व परीक्षा ज्यामध्ये अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट 20 गुण, फिजीक्स 20 गुण, केमेस्ट्री 20 गुण, बायोलॉजी 20 गुण आणि इंग्रजी 20 गुण असे एकुण 100 गुणांची प्रवेश परीक्षा नमुद केली होती. अशा परिक्षेमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण परिचर्या प्रवेशासाठी आवश्यक होते.

भारतीय परिचर्या परिषदेने 8 एप्रिल 2022 रोजीच्या नोटीफीकेशननुसार वरिल पात्रता परीक्षेमध्ये 50 टक्के गुणाऐवजी 50 पसेंटाईल सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी व 45 पसेंटाईल एसटी, एससी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट घालून दिली होती. असे असतानाही नीट-युजी माहितीपत्रक 2020 मध्ये परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये (नीट) 50 टक्के गुणांची अट नमूद करण्यात आली होती़ सदरीस अटीस आव्हान देण्यात आले होते.

परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या पीसीबी 45 टक्के गुणांवर व इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण या पात्रतेवर प्रवेश देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. दरम्यान, या परिपत्रकांवर आक्षेप घेत खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. न्या. रवींद्र घुगे व न्या एस.ए.देशमुख यांच्या खंडपीठात सुनावणी झाल्यानंतर त्यांनी झाल्यामुळे बारावी पीसीबी 45 गुण आणि इंग्रजी उत्तीर्ण हा आधार घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्यांनी हे अपिल फेटाळण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार आता सीईटी सेलने बारावीच्या पीसीबी गुणांच्या आधारावर बीएसस्सी नर्सिंग प्रवेश देण्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने काढले आहे.

बातम्या आणखी आहेत...