आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. विशेष करून राजकीय नेत्यांचा वाढदिवस असला तर शहरातील चौकाचौकात मोठे मोठे होर्डिंग लावले जातात. मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाते. तर गल्लीबोळातील भाईंचे वाढदिवस देखील मोठे वादग्रस्त ठरतात. अशातच औरंगाबाद शहरातील एक वाढदिवस देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
कारण हा वाढदिवस काही एखाद्या नेत्याचा नाही. पण नेत्याच्या वाढदिवसाला देखील लाजवेल असा हा वाढदिवसाचा सोहळा एका रेड्याचा होता. या रेड्याचे नाव सूरज असून या रेड्याच्या वाढदिवसाला शहरभर होर्डिंग लावण्यात आले. तर तब्बल 700 पाहुण्या मंडळींना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले.
दुसरा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय
औरंगाबाद शहरातील शंकरलाल पहाडिया यांच्याकडे नागपूर हेटी प्रजातीचा सुरज नामक रेडा आहे. या सागरला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. कुटुंबातील सदस्याप्रमाणे शंकरलाल हे 'सूरज'चा सांभाळ केला आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी देखील सुरज वर प्रेम करतात. त्यामुळे सुरजचा वाढदिवस देखील अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पहाडिया कुटुंबातील सदस्यांनी घेतला. 6 जानेवारीला सूरजचा वाढदिवस असल्याने महिन्याभरापूर्वीच त्याची तयारी सुरु झाली होती.
महिन्यापासून तयारी, शहरभर लावले होर्डिंग
आपल्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या सुरज रेड्याचा वाढदिवस जंगी साजरा करण्यासाठी पहाडिया यांनी महिन्याभरापूर्वीच तयारी सुरु केली. सूरजचा दुसरा वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होणार असल्याने शहरात त्याच्या वाढदिवसाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी होल्डिंग लावले.
तब्बल 700 पाहुण्यांना आमंत्रण !
हटके वाढदिवसाच्या होर्डिंगमुळे शहरात जोरदार चर्चा सुरु झाली. तर या हटके वाढदिवसासाठी थेट नांदेड व जालन्यातून 50 पाहुणे बोलावण्यात आले. आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणात व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करण्यात आला होता. एकूण 700 च्या जवळपास पाहुण्यांना जेवणांचा आनंद लुटला. तर सुरज माझ्यासाठी मुलापेक्षा कमी नाही. त्यामुळे त्याचाही मुलाप्रमाणे आणि त्यापेक्षा देखील अधिक चांगला वाढदिवस साजरा केल्याचे शंकरलाल पहाडिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
/
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.