आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजामीनपात्र वॉरंट:बिल्डरला अटक नाही, अधीक्षकांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन सदनिका बांधण्यासाठी ६० लाख रुपये घेऊन पसार झालेल्या आरोपी बिल्डरविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावून वर्ष उलटले तरीदेखील त्याला अटक करण्यात आली नाही. याविरोधात दाखल फौजदारी याचिकेत जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना अजामीनपात्र वॉरंट का बजावले नाही याबाबत चार आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी दिले.

जालना येथील जगदीश खट्टर यांनी अॅड. उत्तम बोंदर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, खट्टर यांनी दोन सदनिका बांधून देण्यासाठी बिल्डर केतन शहा याला ४० लाख रुपये दिले व सहा महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्याचा करार केला. मात्र शहा याने सहा महिने उलटूनदेखील सदनिकेचा ताबा अथवा पैसे परत केले नाहीत. याविरोधात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केतन शहाविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही.

तालुका न्यायालयाने बिल्डर शहाला अनेक वेळा समन्स काढले तरीदेखील शहा हजर होत नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढून त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. वर्ष उलटूनदेखील शहाला अटक करण्यात न आल्याने याचिकाकर्ता खट्टर यांनी अॅड. उत्तम बोंदर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. प्रकरणात शासनाच्या वतीने अॅड. राजेंद्र सानप काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...