आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये बिल्डरची आत्महत्या:चार बिल्डरांनी कोट्यवधींना फसवले; घरच्या जिममध्ये घेतला गळफास

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर (55) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता समोर आली. गेल्या तीन दशकांपासून अग्रहारकर बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे सक्रिय होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी डायरीच्या दोन पानांवर चिठ्ठी लिहिली आहे. यात शहरातील चार व्यावसायिकांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यांनी व्यवहारात फसवणूक केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे यात नमूद केले आहे. 30 कोटींच्या घरात हा व्यवहार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अग्रहारकर (55) हे पत्नी, मुलगा, सून व 21 वर्षीय मुलीसह जवाहरनगर परिसरातील उल्कानगरी भागात राहत होते. त्यांचे औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात गृहप्रकल्प तसेच व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. प्रामुख्याने उल्कानगरी, गारखेडा, सूतगिरणी चौकात हे प्रकल्प सुरू आहेत. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासोबत संवाद साधून खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडेपाच वाजता त्यांच्या बंगल्याच्या शेवटच्या मजल्यावर जिममध्ये व्यायामासाठी गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते परतले नाहीत. त्यामुळे पत्नी त्यांना पाहण्यासाठी गेल्या तेव्हा अग्रहारकर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

पत्नीची आरडाओरड ऐकताच त्यांच्या मुलगा व मुलीने धाव घेतली. त्यांना खाली उतरवून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक एस. जे. गायके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संशयितांची नावे जाहीर करण्यास पोलिसांचा नकार

पोलिसांनुसार, अग्रहारकर यांच्या खोलीत डायरी सापडली. त्यातील दोन पानांवर त्यांनी चार व्यावसायिकांसोबत व्यवहारांचा उल्लेख करत कोटींचे आकडे लिहिले आहेत. या चौघांनी फसवणूक केल्याने तणावातून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी संशयित चार बिल्डरांची नावे जाहीर करण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...