आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमआयएचा पुढाकार:औरंगाबादच्या 10 उद्योगांचे बल्गेरिया एक्स्पोत स्टॉल

औरंगाबाद / फेरोज सय्यद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठा इंजिनिअरिंग एक्स्पो १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान बल्गेरिया देशातील प्लोवदिव शहरात होत आहे. युरोपातील बाल्कन कंट्रीत निर्यात करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे. यात मराठवाड्यातील उद्योजकांचा सहभाग वाढावा यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) पुढाकार घेतला आहे. यातून औरंगाबादेतील छोट्या व मध्यम १० हून अधिक उद्योगांना या एक्स्पोमध्ये स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील उद्योगांना जागतिक स्तरावर निर्यातीला चालना देण्यासाठी ही मोठी संधी मानली जाते. बाल्कन कंट्री हा ११ पेक्षा जास्त देशांचा समूह आहे. या देशांत इंजिनिअरिंगशी संबंधित विविध उद्योग आहेत. त्यांच्यासह २५ देशातील उद्योगांचा या एक्स्पोत सहभागी असेल. त्यांच्याशीही औरंगाबादच्या उद्योजकांचा यानिमित्ताने संपर्क, व्यवहार वाढीस मदत मिळणार आहे.

बाल्कन कंट्रीत प्राधान्याने पोलाद, स्टील, ऑटोमोबाइल पार्ट, विविध मशिनरी, इंडस्ट्रियल मशिनरी यांना मोठी मागणी असते. या देशांमध्ये भारतातून दरवर्षी १५ हजार कोटींची निर्यात होते. ऑटोमोबाइल हब असलेल्या औरंगाबादेतील उद्योगांचा यात सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा एक्स्पो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जालन्याच्या स्टील उद्योगालाही इथे मोठी वाव मिळू शकतो, अशी माहिती उद्योग व पायाभूत सुविधांचे अभ्यासक निखिल भालेराव यांनी दिली.

एका स्टॉलमागे ७६ हजारांची सूट
या एक्स्पोत भारतीय पॅव्हेलियनमध्ये शंभर चौरस फुटांच्या स्टॉल्सचे सहा दिवसांचे शुल्क १ लाख ७५ हजार आहे. पण ‘सीएमआयए’ने पुढाकार घेऊन औरंगाबादच्या उद्योजकांना फक्त ९९ हजारांत स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. तसेच येण्या- जाण्याच्या व निवासाच्या खर्चातही ७५ हजारांपर्यंत रिएंबर्समेंट दिली जाणार आहे. ज्या उद्योजकांकडे एक्स्पोर्ट लायसन्स आहे, त्यांनाच या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी असेल.

मराठवाड्यातील निर्यातदारांना युरोपात व्यवसायाची सुवर्णसंधी
औरंगाबादसह मराठवाड्यात निर्यात क्षमता असलेल्या इंजिनिअरिंग कंपन्यांची संख्या मोठी आहे. त्यांना युरोपियन मार्केटमध्ये पाय रोवण्यासाठी ही चांगली संधी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी या प्रदर्शनाच्या संधीचा फायदा घ्यावा. एमएसएमई आणि इतरांनी निर्यात बाजाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याच्या दृष्टीने याकडे पाहिले पाहिजे.
- नितीन गुप्ता, अध्यक्ष सीएमआयए

बातम्या आणखी आहेत...