आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतवर्षी 1 लाख 41 हजार 892 हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली होती. यामुळे बंपर पीक येऊन कारखान्यांनी ऊस घेण्यास दिरंगाई केली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो एकरांतील उस जाळून टाकण्यात आला होता. त्यामुळे यंदा उसाच्या क्षेत्रात घट येईल असा अंदाज होता. मात्र यंदाही उसाचे क्षेत्र 1 लाख 9,899 हेक्टरने वाढले आहे. ज्वारी, बाजरीसह मूग, तूर आणि उडीद या कडधान्यांच्या पेरणीतही घट झाली आहे. सोयाबीन, कापूस या ‘कॅशक्रॉप’च्या लागवडीत मोठी वाढ आहे. सोयाबीन 2 लाख 22,552, तर कापसाच्या लागवडीत 3 लाख 45,048 हेक्टरची वाढ झाली आहे.
मागील वर्षी राज्यात सरासरी 107 टक्के पाऊस झाला होता. यंदा आजवर 120 टक्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. मागील वर्षी म्हणजेच 2021-22 उसासह सर्व पिकांची 119 लाख 13,916 हेक्टरमध्ये लागवड झाली होती. या वेळी हे क्षेत्र 124 लाख 27 हजार 718 हेक्टर ऐवढे आहे. मागच्या हंगामात उसाचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे या वर्षी उसाचे क्षेत्रफळ कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मागील वर्षीच्या 1 लाख 41 हजार 892 हेक्टरमध्ये लागवड झाली होती. यंदा 2 लाख 51 हजार 791 हेक्टर लागवड झाली आहे. म्हणजेच तब्बल 1 लाख 9 हजार 899 हेक्टरची भर पडली आहे. या वेळी एकूण लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे. मागील वर्षी 119 लाख 13 हजार 916 हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. यंदा मात्र 5 लाख 13 हजार 802 हेक्टरने वाढून लागवडीचे क्षेत्रफळ 124 लाख 27 हजार 718 झाले आहे.
21 जिल्ह्यांत 100 टक्यांपेक्षा अधिक पाऊस
राज्यात 11 जिल्ह्यांत सरासरी 75 ते 100% पाऊस झाला आहे. त्यात ठाणे, रायगड, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, वाशिम, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोलीचा समावेश आहे. रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या 21 जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.
शेतकरी आता ‘कॅशक्रॉप’कडे वळला आहे
ऊस, कापूस आणि सोयाबीनला सातत्याने वाढता दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी मागील वर्षीच्या तुलनेत डाळवर्गीय पिकांऐवजी ‘कॅशक्रॉप’कडे वळलेला दिसतो आहे. असे औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.