आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:वडगावात घरफोडी; साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, रोख लंपास

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक परिसरातील वडगाव गट नंबर-७ मथुरानगर येथील अतुल प्रकाश चौधरी (३८) यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड हजार रुपये लंपास केल्याची घटना २ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चौधरी यांच्या तक्रारीवरून ४ मे रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौधरी १ मे रोजी घराला कुलूप लावून कामानिमित्त नाशिक जिल्ह्यात गेले होते. ते काम आटोपून दुसऱ्या दिवशी परत येत असताना त्यांना शेजारी राकेश पाटील यांनी फोन करून घराचा कडीकोयंडा तुटल्याचे सांगितले. २ मे राेजी सकाळी ८.३० वाजता चौधरी घरी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व दीड हजार रुपये रोख चोरी गेल्याचे समजले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र, बंदोबस्तामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता ४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...