आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमाननगर वाळूज येथील घर मालकाकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्यांनीच घरातील सोन्याचे दागिने व महागड्या साड्या लंपास केल्याची घटना 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी घर मालकीण अनिता सतीश गोयल (वय, 48) यांच्या फिर्यादीवरून भाडेकरू निलेश शिवणकर, पूजा शिवणकर व गजानन मानकर यांच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता गोयल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्या कुटुंबियांसह प्लाट नंबर 35, हनुमाननगर वाळूज ता. गंगापूर येथे दोन मजली इमारतीत राहतात. याच इमारतीत दोन खोल्यात निलेश शिवनकर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दरम्यान मंगळवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोयल यांच्या घरातून त्यांच्या तीन महागड्या साड्या घरातील कपाटातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दागिनेही झाले चोरी
गोयल यांच्या तीन साड्या चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी घरातील इतर वस्तूंची बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना 30 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रम वजनाचे सोन्याचे गंठण, 30 हजार रुपये किमतीचे 10 ग्रँम वजनाचे नेकलेस, 15 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रँम वजनाची सोन्याची पोत, 18 हजार रुपये किंमतीच्या व प्रत्येकी 3 ग्रँम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 1 हजार 500 रुपये किमतीच्या प्रत्येकी 1 हजार रुपये किमतीच्या तीन साड्या. असा एकूण 96 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व साड्या चोरून नेल्याचे उघडकीस आले.
भाडेकरू विरुद्ध गुन्हा दाखल
घरातील सोन्याच्या वस्तू व साड्या चोरी गेल्याचे निदर्शनास येताच गोयल यांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत निलेश एकनाथ शिवनकर (वय 30), पुजा निलेश शिवनकर (वय 25) दोघे (मूळ रा. शिनगाव जहागीर ता. देऊळगाव राजा), गजानन बाबुराव मानकर (वय 32) या संशयितांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण जाधव करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.