आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली शहरात चीनच्या राष्ट्रध्वजाचे दहन ,चिनी विरोधात घोषणाबाजी

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने बुधवारी (ता. १७) दुपारी  चीनच्या राष्ट्रध्वजाचे दहन करून चीन विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. भारताने चीनला जशास तसे उत्तर द्यावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

भारत-चीन सीमारेषेवर मागील काही दिवसापासून तणाव सुरू आहे त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच चीनच्या जवानांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. तसेच काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीच्या  निषेधार्थ आज हिंगोली येथे विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने चीनच्या राष्ट्रध्वजाचे दहन करून चीन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विराट राष्ट्रीय लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, शेख नफीस पहिलवान, शेख अतिक, शेख नोमान नावेद, तौफीक अहमद, शेख बसित, रवी जैसवाल,  तूफेल बागवान ,प्रतीक जैसवाल, गजानन सोनुले, जफर बागबान, मोहमद कलिम, कलिम खान उपस्थित होते. भारताने चीनला जशास तसे उत्तर देऊन धडा शिकवावा, तसेच देशातील व्यापाऱ्यांनी चिनी बनावटीच्या वस्तूं विक्रीवर तसेच नागरिकांनीही चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी वर बहिष्कार टाकावा असे आवाहन यावेळी शेख नईम शेख लाल यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...