आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:होळीच्या पार्श्वभुमीवर ई कॉमर्स कंपन्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे आंदोलन

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत होळीच्या पार्श्वभुमीवर ई कॉमर्स कंपन्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून या कंपन्यांना देशात ऑनलाईन व्यापार करण्यास बंदी घालावी अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने रविवारी ता. २८ करण्यात आली आहे.

देशात ई कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन व्यापार केला जात आहे. या कंपन्या भारतात व्यापार करीत असले तरी त्याचा फायदा विदेशी कंपन्यांना मिळत आहे. त्यामुळे देशातील लहान व्यावसायीत अडचणीत सापडले आहेत. या कंपन्यांना ऑनलाईन व्यापार करण्यास बंदी घालावी अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने वेळोवेळी केली आहे. या मागणीसाठी संघटनेने केंद्र व राज्य शासनाकडे निवेदन सादर केले आहे. मात्र त्यानंतरही व्यापाऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दरम्यान, आज होळीच्या पार्श्वभुमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत ई कॉमर्स कंपन्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी व्यापाऱ्यांनी या कंपन्यांच्या ऑनलाईन व्यवहारावर बंदी घालावी अशी मागणीही केली. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, कैलास काबरा, गजेंद्र बियाणी, संजय देवडा, सुमीत चौधरी, माबुद बागवान, नरेश देशमुख, आशिष पोरवाल, आनंद अग्रवाल, गजानन इंगळे, विठ्ठल वडकुते यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. या नंतर संघटनेच्या वतीने आणखी तिव्र आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.

केंद्राच्या एफडीआय धोरणाचे उल्लंघन ः अनिल नेनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स

केंद्र शासनाने एफडीआय धोरणामधे काही बाबी स्पष्टपणे नमुद केल्या आहेत. मात्र त्यानंतरही ई कॉमर्स कंपन्यांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. केंद्र शासनाने नव्याने आदेश काढून विदेशी कंपन्यांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नवीन धोरणात तरतुद ठेवावी. देशात सर्व जिल्हास्तरावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, पदाधिकारी प्रविण खंडेलवाल, महेश बखई, सुरेश ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखआली हे आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...