आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भोकरदन(जालना)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन ते जाफराबाद रस्त्यावरील विरेगाव येथील पुलाजवळ संभाजीनगरहून मलकापूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. विष्णू त्रंबक गारुडी (वय-55) व त्यांच्या पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय- 50) अशी मृतांची नावे आहेत.

वालसावंगी येथील गारुडी दांपत्य हे आपल्या दुचाकीवर भोकरदन येथे एका लग्नासाठी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान येत होते. विरेगाव जवळील पुलाजवळ आल्यानंतर संभाजीनगर-मलकापूर (एमएच- 40, एन- 9948) या एसटीने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने जखमी अवस्थेत त्यांना जालना येथे हलवण्यात आले. परंतू, जालना येथे नेत असताना पती विष्णू गारुडी यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली तर उपचारादरम्यान मंगलाबाई यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर सदरील एसटी भोकरदन पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली असून चालक ही पोलिस ठाण्यात हजर झाले.

बातम्या आणखी आहेत...