आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामकरण:बसस्थानकाचे नाव बदलले, 546 पाट्या आठ दिवसांत बदलणार

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्यानुसार मध्यवर्ती, सिडको बसस्थानकांचे नावही बदलले आहे. येत्या आठ दिवसांत ५४६ बसच्या पाट्यांची नावे बदलण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नामकरण करण्याचे निर्देश रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी बसस्थानकाचे नामकरण केले. विभागातील ५४६ बसच्या पाट्यांचे नाव बदलण्यासाठी ठेकेदारासोबत करार केला आहे. आठ दिवसांत छत्रपती संभाजीनगर ते अकोला, नांदेड, पुणे, नाशिक अशा नवीन पाट्यांच्या बस धावतील. इतर आगारांतून येणाऱ्या बसची संख्या ३५० आहे. त्या सर्व बसच्या पाट्याही बदलणे अनिवार्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...