आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बिडकीन स्थानकात स्वच्छतागृहासाठी भीमगर्जना संघटनेतर्फे बस रोको आंदोलन

बिडकीन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील बिडकीन बसस्थानकात अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे महिला व पुरुष प्रवाशांची कुचंबणा होत आहे. मात्र या समस्येकडे एसटी महामंडळचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. याचा निषेध म्हणून भीमगर्जना सामाजिक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे निवेदन देत वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली एसटी बस रोखून आंदोलन केले.

त्यानंतर पैठण आगाराचे डी. एम. तरोडे यांना निवेदन सादर केले. या वेळी राज्य सचिव शेख इलियास, महाराष्ट्र सरचिटणीस अशोक गरुड, जिल्हा कार्याध्यक्ष फेरोज मिर्झा, तालुका सल्लागार वसंत शेजूळ, जिल्हा प्रभारी शेख राजू, स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ हिवाळे, संजय पवार, बिडकीन कार्याध्यक्ष रोहिदास जाधव, नीलेश धडे, अफसर शेख, सलीम मिर्झा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...