आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळेंचा सल्ला:युवकांनो, तुमच्याकडे ‘बिझनेस आयडिया’ असेल तर ‘टीबीआय’ तुम्हाला 30 लाखांचे करेल अर्थसहाय!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांनो, जर तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट ‘बिझनेस आयडिया’ असेल तर तुम्ही ‘टेक्नॉलॉजी बिझनेस इन्कुबेटर’शी (टीबीआय) संपर्क करा. ते तुम्हाला 30 लाखापर्यंतचे अर्थसहाय करतील. अन् तुमच्या स्वप्नातील उद्योग उभा करण्यास मदत करतील. हा सल्ला ज्येष्ठ उद्योगती तथा ‘डिक्की’चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. ‘पद्म फेस्टिव्हल’साठी ते औरंगाबादला आले होते, त्यावेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी खास बातचीत केली.

ते म्हणाले, ‘पुण्यात पाच टीबीआय आहे. शिवाय राज्य सरकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इन्नोव्हेशन सोसायटी’ आहे. विद्यापीठे, मोठ्या तंत्रशास्त्र संस्थांमध्ये ‘अटल इंक्युबिशन सेंटर्स’ आहेत. येथेही ‘बिझनेस आयडिया’ सादर करू शकतात. आपल्या आयडियाची पडताळणी होईल.

जर आपली आयडिया खरोखर इन्नोव्हेटिव्ह असेल तर तुम्हाला आर्थिक सहकार्य मिळेल. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाला देशातील सर्व टीबीआय संलग्न आहेत. आपल्याकडे 450 इंक्युबेटर सेंटर्स आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनीनी वा युवक आपल्या बिझनेस आयडियाचे प्रेझेंटेशन करू शकतील.

30 लाखांचे अर्थसहाय घेताना तुम्ही (ओसीपीएस) ऑप्शनल कन्हर्टेबल प्रिफेर्ड शेअर्स करू शकतात. हे शेअर फक्त तुम्ही कागदावर द्यायचे आहेत. आजचे जग हे बुद्धी असणाऱ्या युवकांचे आहे. तुमच्याकडे पैसे, भाग भांडवल नसले तरी चालेल पण कुशाग्र बुद्धी असली पाहिजे. युवकांना उद्योग, स्वयंरोजगार उभारण्यासाठी सध्या सर्वोत्तम काळ आहे. काही सरकारी योजनांमध्ये स्वत:चा 5 ते 10 टक्के शेअर द्यावा लागतो, तो गरजेचाच आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक मदत करणारी वित्तीय संस्था दिवाळखोतरीत निघते. बिझनेसची ओनरशिप हवी असेल तर तुम्हाला काही तरी स्वतःचे द्यावेच लागते..!'

महिलांचे प्रमाण वाढतंय

उद्योगातच काय, सर्वत्रच सध्या महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. पण सध्या मुंबई शेअर बाजारकडे नोंदणी असलेल्या एकूण कंपन्यांपैकी सुमारे 500 कंपन्यांत महिलांचेच वर्चस्व आहे. आम्ही लोक सरकारला आमच्या सूचना आणि अनुभव सांगतो. त्या आधारावर उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार योजना आखतात. योजना बनवताना काही त्रुटी जरूर राहतात. पण हा सगळा ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ आहे. हळू-हळू आपण स्वावलंबन संकल्पाकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी म्हटले.

संवाद कौशल्यासाठी ऑनलाईन क्लास करा

आजच्या युवकांत संवाद कौशल्याचा आभाव आहे. पण त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस आहेत. विशेषत: इंग्रजीचा न्यूनगंड असतो. असंख्य ऑनलाईन स्पिकिंग कोर्स आहेत. त्यात भाग घेऊन स्वत:च्या करिअरच्या दृष्टीने स्वत:मध्ये बदल करावा. असेही कांबळे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...