आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावक्फ संस्थांच्या मुतव्वलींची प्रलंबित ६५ प्रकरणे मार्गी लावण्याच्या, १६९ कर्मचारी पद भरतीचा प्रस्ताव तसेच २०२ मालमत्तांचे नोंदणीकरण करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र वक्फ बोर्डाने मान्यता दिली आहे. बोर्डाच्या वक्फ जमिनींचा लवकरच विकासही करण्यात येणार आहे. नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष डाॅ. वजाहत मिर्झा यांनी दिली. डाॅ. मिर्झा म्हणाले की, बैठकीत वक्फ बोर्डाचे काम प्रभावी व लोकाभिमुख करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
आता संबंधितांचा वेळ व पैसा खर्च होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोर्डाचे शिबिर घेण्यात येणार आहे. त्याद्वारे वक्फसंबंधी तक्रारींचे “ऑन द स्पॉट” निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बैठकीत नियम ३६ च्या एकूण २०२ मालमत्तांचे नोंदणीकरण, नियम ४३ चे ३९ प्रस्ताव, अहवाल बदलाचे १७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. बैठकीत एकूण ४० प्रकरणे ठेवण्यात आली होती. वक्फ बोर्डाच्या या बैठकीला खासदार फौजिया खान, हसनैन शाकेर, डॉ.मुदस्सीर लांबे, मौलाना हाफिज अथर अली, समीर गुलाम नबी काझी, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच संबंधित अधिकारीही उपस्थित होते.
भरतीची प्रक्रिया लवकरच बोर्डाने गेल्या वर्षी शासनाकडे कर्मचारी भरतीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण १६९ अधिकारी, कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या या पदभरती आराखड्यास बोर्डाच्या बैठकीत सर्वानुमते हिरवा कंदील दाखवण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयाने बोर्डाच्या कामकाजात गतिशीलता येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी मिळाल्याने कामकाज सोयीस्कर होईल. कर्मचारी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.