आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीचे क्रीडा उपसंचालक विजय संतान यांच्यासह तत्कालीन कारकून अमित खाेमणे आणि निवृत्त उपसंचालक जनक टेकाळे यांना एनसीसीमध्ये तरतूद नसतानाही केली ३५ जणांची पद भरती चांगलीच महागात पडली. या प्रकरणी शासनाने २०२० मध्ये पद भरती करणाऱ्या संतानसह टेकाळे व खाेमने यांच्याविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विभागाने २ आॅगस्ट रोजी या तिघांविरुद्ध पुण्यातील येरवडा ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र, याची कुणकुण लागताच तिघेही फरार झाल्याची माहिती आहे. आता येरवडा ठाण्याचे तपास पथक कारवाई करत आहेत. क्रीडा विभागातील बाेगस पद भरतीचा हा प्रकार ‘दिव्य मराठी’ने २२ डिसेंबर २०२० रोजी उघडकीस आणला हाेता. क्रीडा विभागाकडून तत्कालीन उपसंचालक संतान व टेकाळे यांनी काेणतेही आदेश नसताना मर्जीनुसार कारकून, वाहन चालक, सेवक अशी ३५ पदे भरली हाेती. यात माेठा आर्थिक व्यवहारही झाला हाेता.
आम्ही फिर्याद दिली शासनाकडून या तिघांविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाचे पत्र मिळाले. आम्ही सर्व कागदपत्रे जमा करून येरवडा ठाण्यात फिर्याद नाेंदवली. पुढील प्रकिया आता पाेलिस करत आहेत. ओमप्रकाश बकाेरिया, क्रीडा आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.