आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिकांचा मेळा:ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या व्याख्यानाची औरंगाबादकरांना पर्वणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या ऐकण्याची पर्वणी उद्या औरंगाबादकरांना मिळणार आहे.

‘भूक’ आत्मकथेचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या ‘भूक’ या आत्मकथेचे लोकार्पण उद्या सकाळी ११ वाजता निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात करण्यात येणार आहे. महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्यात राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी राहणार आहेत. जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. भारतीय दलित पँथरचे संस्थापक तथा ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार पुस्तकावर भाष्य करणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानचे संतोष गडकरी, सचिन सुरडकर, चेतन पब्लिकेशन्सचे संचालक प्रा. चेतन सरवदे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, डॉ. मधुकर खंदारे आणि सिद्धार्थ आल्टे यांनी केले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी केले प्रकाशन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात या पुस्तकाचे (17 मे) प्रकाशन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी जातीव्यस्थेचे वेळीच उच्चाटन झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ऐनिहेलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथाचे सर्वांनी अनुकरण केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...