आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या शहरात ज्याप्रमाणे अजून मनपाचे पाणी पोहोचले नाही, त्याचप्रमाणे ड्रेनेजची पाइपलाइनही पोहोचली नाही. ही बाब लक्षात घेऊन शहरातील नो-नेटवर्क झोनसाठी ड्रेनेज प्रकल्प राबवण्यासाठी पीएमसीकडून ८० टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक झोन कार्यालयास नकाशा पाठवला जाणार असून त्यामध्ये एखादा भाग वगळला गेल्यास किंवा डबल झाल्यास त्याची पडताळणी केली जाणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत उर्वरित भागातील ड्रेनेजचा डीपीआर बनवण्यात येऊन मनपा प्रशासकांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यूडीआयएसएसएमटीअंतर्गत महापालिकेने ३९४ कोटी रुपयांचा ड्रेनेज प्रकल्प मंजूर केला. तो राबवताना नो-नेटवर्क एरिया भागाचा विचार केला गेला नाही. खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या एजन्सीमार्फत जुन्या शहरातील नाल्यांमधून ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. या ड्रेनेजलाइनला अंतर्गत लाइन जोडण्यात आल्या. त्यासोबतच नक्षत्रवाडी येथे १६१ एमएलडी, झाल्टा येथे १० एमएलडी, आणि सिडको एन-१२ या ठिकाणी ५ एमएलडी क्षमतेचा असे तीन एसटीपी प्लँट बनवण्यात आले. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करून घेण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत मनपाने ताब्यात घेतला. त्यामुळे शहराच्या विस्तारित भागात ड्रेनेजलाइन टाकण्यात आली नाही. वारंवार मागणी होत असल्यामुळे महापालिकेने नो-नेटवर्क एरियामध्ये ड्रेनेजलाइन टाकण्याचा निर्णय घेतला.
गल्लीत जाऊन सर्वेक्षण सुरू ड्रेनेजलाइनसाठी यश इनोव्हेशन या प्रकल्प सल्लागार संस्थेची नियुक्ती केली असून या संस्थेमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गुगलद्वारे संबंधित भागाच्या इमेजेस घेऊन गल्लोगल्ली जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत नो-नेटवर्क भागातील ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले.
पडेगाव, मिटमिटा भागात प्लँट डीपीआर तयार करताना त्यामध्ये पडेगाव-मिटमिटा भागात सिव्हरेज प्लँट प्रस्तावित केला जाईल. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी यातून कोणताही भाग सुटणार नाही याची काळजी घेण्यात येईल. फेब्रुवारीअखेरपर्यत डीपीआर तयार केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.