आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना उद्रेक:मार्चअखेर राज्यातील एकूण 80% सक्रिय रुग्ण हाॅटस्पाॅट ठरलेल्या 10 जिल्ह्यांत

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाॅटस्पाॅट नांदेडचा रिकव्हरी दर सर्वात कमी 69.8 टक्के

राज्यात मार्चमध्ये झालेल्या कोरोना उद्रेकाची सर्वाधिक झळ पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसली आहे. मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार हे जिल्हे सक्रिय रुग्णांच्या बाबतीत राज्यात हाॅटस्पाॅट ठरले आहेत. राज्यात ३१ मार्चअखेर कोरोनाचे ३,५६,२४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी या १० जिल्ह्यांत २,८६,४७६ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ८०.४१ टक्के रुग्ण या १० जिल्ह्यांत आहेत. यात नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वात चिंताजनक ६९.८ टक्के आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, सोलापूर, उस्मानाबाद व बीडमध्ये मृत्युदर चिंताजनक; राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त
मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, मुंबई, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, सिंधुदुर्ग आणि लातूर या जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण मृत्युदर चिंताजनक पातळीत पोहोचला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.९४ टक्के असून देशात हा दर १.३४ टक्के आहे. राज्यातील या सर्व जिल्ह्यांत रुग्ण मृत्युदर राज्याच्या सरासरी मृत्युदरापेक्षा जास्त नोंदवण्यात आला आहे.
(सर्व आकडेवारी ३१ मार्च २०२१ पर्यंतची)

बातम्या आणखी आहेत...