आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-वाहन धोरण:महिनाअखेर 15 एसी इलेक्ट्रिक बस धावणार ; डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चअखेर शहरातील प्रवाशांना वातानुकूलित इलेक्ट्रिक सिटी बसचा आनंद घेता येणार आहे. वर्षभरात ३५ इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यापैकी १५ बसेस मार्चअखेरीस येतील, अशी माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या ई-वाहन धोरणानुसार व पर्यावरण संवर्धनासाठी स्मार्ट सिटीने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला. पण बस खरेदी न करता त्या भाड्याने घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी हैदराबाद येथील ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली. ३५ इलेक्ट्रिक बसची खरेदी, ती चालवणे, त्यांची देखरेख करण्याची जवाबदारी एजन्सीकडे राहील.

प्रवासी तिकिटामधून येणारे सर्व उत्पन्न स्मार्ट सिटीला मिळेल, तर एजन्सीला प्रति किलोमीटर ५९ रुपये मोबदला दिला जाईल. मार्चअखेरीस पहिल्या टप्प्यात १५ बस, तर दुसऱ्या टप्प्यात २० बस येतील. स्मार्ट सिटीने यापूर्वी टाटा कंपनीकडून १०० बस खरेदी केल्या हाेत्या. इलेक्ट्रिक बस आल्यानंतर शहर बसची संख्या १३५ वर जाणार आहे.

तिकिटाचे दर निश्चित नाहीत मनपा कंपनीला प्रति किमी ५९ रुपये देईल. त्यामुळे प्रवाशांसाठी किती तिकीट आकारणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही प्रवाशांचे तिकीट आणि ठेकेदाराला देण्यात येणारा दर यातील फरक मनपालाच भरावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...