आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:राज्यात पोलिस दलात 12,500 जागा भरण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी - गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई; लवकरच प्रक्रिया सुरू होणार

हिंगोली16 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांवर टिका करणाऱ्या विरोधकांचा घेतला समाचार

राज्यात पोलिस दलात अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता 12,500 जागा भरण्यास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली असून प्रत्येक जिल्हयांतून रिक्त जागा व रोष्टर नुसार भरतीबाबत माहिती घेतली जात आहे. पुढील काही दिवसांतच भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी ता. 18 पत्रकार परिषदेत दिली आहे.

येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री देसाई यांच्यासह संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, राजू चापके, राम कदम, दिलीप बांगर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना देसाई म्हणाले की, राज्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे लवकरच हि भरती केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हयातून रिक्त जागा, रोष्टरनुसार जागा, राखीव जागा याची माहिती घेतली जात आहे. या माहितीचे संकलन झाल्यानंतर तातडीने प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरु केली जाईल.

राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाने तसेच नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतींचा प्रश्‍न आहे. मात्र मागील वर्षी कोविडमुळे राज्याच्या तिजोरीत 1 लाख 25 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी आले आहे. तर उपलब्ध निधी कर्मचाऱ्यांच्या वेतन अन कोविडवर खर्च झाला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर आल्यानंतर सर्व प्रश्‍न सोडविले जातील.

पोलिसांच्या निवासस्थानाबाबत शासन संवेदनशील असून पोलिस गृहनिर्माणसाठी मागील वर्षी 350 कोटी रुपये राखीव ठेवले होते यावर्षी ही रक्कम 800 कोटी करण्यात आली आहे. पुढील काळात निवासस्थानांचा प्रश्‍नही सुटणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेला सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती दिली जात असून जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचा घेतला समाचार
कोविडमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर निघाले नाही असा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र सरकारमधील आम्हा मंत्र्यांना लालदिव्याच्या गाड्या काय फिरायला दिल्या काय असा सवाल केली. आवश्‍यक त्या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भेटीही दिल्या आहेत. शिवाय आम्हीही प्रत्येक जिल्हयाची माहिती दिली आहे. विरोधक मंडळी कुठलेही काम न करता काम केल्याची टिमकी वाजवित असल्याचा आरोप करीत केला.

बातम्या आणखी आहेत...