आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाज आक्रमक:आमचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा, मराठा समन्वय समितीची मागणी, लक्ष वेधण्यासाठी करणार जागरण गोंधळ आंदोलन

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाचे प्रश्नांवर मंत्रिमंडळात विस्तृत चर्चा व्हावी व सर्व प्रश्न व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समन्वय समितीच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी राज्यभर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे किशोर चव्हाण, रवींद्र काळे, संजय सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप शिवसेना सरकारने गत पाच वर्ष झुलत ठेवले. तशी वेळ महाविकास आघाडी सरकारच्या काळात येऊ नये. सर्व प्रश्न तातडीने सोडवली जावेत. यासाठी सरकारवर दबाव गट कायम ठेवण्यासाठी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मराठा समन्वय समिती स्थापन केली आहे. विधान परिषदेत मराठा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कणखर बाण्याचे आमदार विनायक मेटे यांना अध्यक्ष केले आहे.

या समितीच्या माध्यमातून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सरकार काय करत आहे, काय करायला हवे, विविध समस्या सोडवण्याची काय नियोजन केले आहे, यासाठी दोन दिवसीय मंत्रीमंडळात दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, मंत्री अशोकराव चव्हाण यांना उपसमिती अध्यक्षपदावरून कार्य मुक्त करावे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पेक्षा कोर्टात प्रत्यक्ष मराठा आरक्षणावर सुनावणी व्हावी, घटनापीठाकडे हे प्रकरण चालावे, सारथी योजना पूर्ण क्षमतेने राबवावी, वेळेत विद्यावेतन अदा केले जावे. आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळास ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबियांना तातडीने १० लाख रुपये व नोकरी मिळावी, १३ हजारांवर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे काम चालू करावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून कायद्याचा धाक तयार होईल. पंजाबराव वस्तीगृह योजनेची अंमलबजावणी व्हावी, २०१४,१५ मध्ये एसईबीसी अंतर्गत ज्या उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या त्यांना नोकरीत सामावून घ्यावे. २८ जुलै २०२० रोजीचा निर्गमित आदेश रद्द करावा या प्रमुख मागण्यासाठी जागर गोंधळ आंदोलन होणार असल्याचे चव्हाण, काळे, सावंत म्हणाले. या वेळी सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, निलेश ढवळे, सचिन मिसाळ, शैलेश भिसे, अॅड. अविनाश औटे, आतिश गायकवाड, सोमनाथ मगर, अनिल राऊत, गंगाधर औताडे, महेश जोगदंड, अतुल औतडे, बाबा पाटील गायकवाड आदी उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन केले. आता मराठा समन्वय समिती रिंगणात उतरले आहे.

बातम्या आणखी आहेत...