आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:उत्कृष्ट लघुउद्योग पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लघुउद्योग घटकाच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम राहावा तसेच स्पर्धात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे उत्कृष्ट लघुउद्योग घटकांची निवड करून पुरस्कार दिले जातात. यासाठी उद्योग संचालनालयाच्या उत्कृष्ट लघुउद्योग जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना www.di.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. २०२१ साठी १ जानेवारी २०२१ च्या अगोदर स्थायी लघुउद्योग व गेल्या दोन वर्षांपासून सलग उत्पादनात आहेत, असे लघुउद्योग या पुरस्कारासाठी पात्र आहेत. घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. प्रथम पुरस्कार विजेत्यास शाल, श्रीफळ व पंधरा हजार, द्वितीय पुरस्कार विजेत्यास शाल, श्रीफळ व दहा हजार अशी रोख रक्कम मिळणार आहे.