आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ घटनास्थळी धाव:112 क्रमांकावर कॉल; विनयभंग

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून बंद खोलीत मुलींसोबत तासन््तास आत बसणाऱ्या तरुणाचा व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या मित्रांचा नाहक त्रास होत असल्याने सोसायटीतील नागरिकांनी शनिवारी ११२ क्रमांकावर फोन करून या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शनिवारी दुपारी ४ वाजता पोरस रवींद्र गोरे (२१) याच्यासह तरुणीला ताब्यात घेतले. पुढे पोलिसांनी दोघांना समज देऊन सोडून दिले.

मात्र, या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी पोरसने त्याच्या साथीदारांसह पुन्हा रात्री ८:३० वाजता सोसायटीत जाऊन पोलिसांना कोणी बोलावले, कोणाची हिंमत झाली, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घराच्या कड्या लावून घेत आत बसणे पसंत केले. त्यानंतर आरोपीने दरवाजांवर थापा मारत शिवीगाळ करत एका २३ वर्षीय विवाहितेचा हात धरून विनयभंग केल्याचा प्रकार घडला.