आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री कार्यालयातून बोलवले, पण आता घेतले नाही:राजकीय बैठका बोलवून वांझोट्या चर्चा किती दिवस चालवणार; मराठा समन्वयक संतप्त

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा व निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून बोलवले व बैठकीला आत जावू दिले नाही. जे आतामध्ये गेले होते त्या कुणाला बोलू दिले नाही, अशा राजकीय बैठका बोलवून वांझोट्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस चालवणार आहात? असा प्रखड प्रश्न उपस्थित करून वेळ न घालता मराठा आरक्षण ओबीसीतून जाहीर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मराठा समन्वयकांनी आज दिली.

डॉ. शिवानंद भानुसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुनील कोटकर आदी समन्वयकांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हे समन्वयक आक्रमक झाले होते.

आत येऊ दिले नाही

मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला औरंगाबादेतील समन्वयकांना बोलवले होते. पण जेव्हा बैठक सुरु होणार तेव्हा आत सोडण्यात आले नाही. धावपळ करत गेलेल्या मुख्य समन्वयकांनाच बैठकीत येऊ दिले गेले नाही. यामध्ये प्रा. चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, सतीश वेताळ यांचा समावेश आहे. फक्त राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या व त्यांचे एकतेतील अशाच बोटावर मोजता येईल, अशा दोघा तिंघाना आतमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

दादा भुसेंनी खाली बसवले

बैठकीत कुणालाही बोलण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तरी मराठा तरूण योगेश केदार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या हाताला धरून खाली बसवले. छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी बोलण्यावर बंधने घातली होती. त्यामुळे बैठकीत मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा झाली नाही.

वांझोटी चर्चा

विनोद पाटील यांनी विद्यार्थी नियुक्ती संदर्भात सरकारने काय केले पाहिजे, याबाबत सूचना केली. सारथी, अण्णासाहेब आर्थिक महामंडळावर वांझोटी चर्चा झाल्याने सुनील कोटकर, डॉ. भानुसे, चंद्रकांत भराट, रवींद्र काळे, रेखा वाहटुळे आदींनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवून चर्चेची गरजच नाही. सरकारला सर्व माहिती आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देऊन प्रत्यक्ष कृती करावी. अन्यथा आता तांडव होईल, असा निर्वाणीचा इशारा दिला.

संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य नाही

मराठा क्रांती मोर्चाला कुणाचेही नेतृत्व मान्य नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या गादीला मान देतो. युवराज संभाजीराजे यांनी स्वतचा पक्ष, संघटना काढली आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही. खासदारकीसाठी त्यांचे काही लुडबुड सुरु असावी, त्यांनी जरूर करावी. मात्र, ते अथवा इतर एक दोन कुणी म्हणजे समाज गृहीत धरू नये. हिंमत असेल तर सरकारने औरंगाबादेत एका सभागृहात खुल्ली चर्चा ठेवावी. असे आवाहनही डॉ. भानुसे, कोटकर, काळे, भिसे, भराट, वहाटुळे आदींनी केले.

बातम्या आणखी आहेत...