आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस तासभर हादरले:करमत नसल्याने 112 वर कॉल करत पोलिस ठाणे बॉम्बने उडवण्याची धमकी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीत जाण्यापूर्वी रस्त्यावरून गस्तीवरील ११२ डायलची गाडी समोरून गेली. करमत नसल्याने टाइमपास म्हणून त्याने काॅल लावला, तर समोरून काय मदत हवी, कोण बोलताय, अशी वारंवार विचारणा सुरू होती. हा संवाद एक मिनिट ऐकत त्याने अचानक चार वेळा ‘आज ४ वाजता कोणतेही पोलिस ठाणे बॉम्बने उडवणार’ अशी धमकी दिली. गणेशोत्सवाच्या तयारीतील शहर पोलिस एका कॉलने हादरले. तत्काळ बॉम्ब स्क्वाड सक्रिय झाले. सायबर पोलिस व गुन्हे शाखेने तपास सुरू करत तासाभरात शुभव वैभव काळे (२३, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याने कॉल केल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. शुभम नववी पास असून एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हायअलर्ट जारी केला आहे. सर्व पोलिस विभागांना २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, सोमवारी एका टवाळखोरामुळे औरंगाबाद पोलिस तासभर धारेवर धरले गेले. दुपारी ३ वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला वारंवार ‘मी आज पोलिस स्टेशन उडवणार’ अशी कॉलद्वारे धमकी प्राप्त झाली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. सर्वांना सतर्क केले. पोलिस ठाण्यांत कळवल्याने भीती निर्माण झाली. बॉम्बशोधक व नाशक पथक ठाण्यात रवाना केले. दुसरीकडे गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी प्राप्त कॉलच्या क्रमांकावरून शोध सुरू केला.

कंपनीत जाऊन आवळल्या मुसक्या गुन्हे शाखेसह सायबरचे पथक रवाना झाले. तपासात कॉल सिडको एमआयडीसी भागातून आल्याचे स्पष्ट होताच निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना रवाना केले. तांत्रिक तपासात परिसर कळला, मात्र नेमके ठिकाण कळत नव्हते. म्हस्के यांच्यासह सहायक फौजदार सतीश जाधव, जितेंद्र ठाकूर, संजय राजपूत, विठ्ठल सुरे यांनी पाच ते सहा कंपन्यांत जाऊन काळे नावाचा इसम शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका कंपनीतून त्याच्या मुसक्या आवळल्या.

बातम्या आणखी आहेत...