आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा व्हिलन:​​​​​​​गडकरी, पवारांना हीरो म्हणायच्या नादात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या हस्ते डी.लिट. ही मानद पदवी देऊन गौरवले. त्या वेळी दोन्ही नेत्यांची स्तुती करताना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत गडकरी, पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ते म्हणाले, ‘ शिवाजी आता जुन्या युगातील आहेत. या राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत. कोश्यारी यांनी यापूर्वी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावेळी कोश्यारींच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते.

तत्पूर्वी मुंबईतील एका भाषणात त्यांनी मराठी माणसांवर टीका केली होती. आता शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी.लिट. प्रदान केल्यानंतर ते म्हणाले, ‘मागच्याच वर्षी या दोघांनाही माझ्याच हस्ते मानद पदवी देण्यात आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डी.लिट. दिली आहे. आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डी.लिट. देणे बाकी आहे. त्या विद्यापीठांचे प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित आहेत. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कुणी सापडत नाहीत का.? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम आदर्शवत आहे. त्यामुळे त्यांनाच डी.लिट. द्यायची आहे.

म्हणून आता माझाही नाइलाज आहे. असले आदर्श होण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आमच्या शाळेत आम्हाला विचारले जायचे त्या वेळी आमच्यातील कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी नेहरू तर कुणी गांधीजींचे नाव घ्यायचे. आता नव्या युगात तर तुम्हाला आदर्श शोधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. याच महाराष्ट्रात आदर्श मिळतील. शिवाजी तर आता जुन्या युगातील झाले आहेत. नव्या युगात नितीन गडकरी आणि पवार हेच हीरो आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान सावरकरांच्या माफीनाम्याबाबत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा पत्र पाठवले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पुन्हा नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

गडकरींची तुलना डॉ. आंबेडकरांशी : महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरींपर्यंतचे आदर्श तुम्ही स्वीकारले पाहिजे. असे म्हणत त्यांनी डॉ. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही करून टाकली. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्हाला जर कुणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे आदर्श आहेत. गडकरींना रोडकरी म्हटले जाते. पवार आणि गडकरी हे दोघेही व्हिजनरी नेते आहेत. गडकरी तर व्हिजनरी आणि मिशनरी असे दोन्हीही आहेत. आजकाल मिशनरी असणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

हिंदीत वक्तव्य असे जब हम स्कूल में थे तो हमसे पूछा जाता था कि स्कूल में हमारा रोल मॉडल कौन है। कुछ लोग सुभाष चंद्र को पसंद करते थे, कुछ नेहरू को, कुछ गांधीजी को। आप महाराष्ट्र में ही अपने आदर्श पा सकते हैं। अगर कोई आपसे पूछता है कि आपके हिरो कौन हैं, तो मुझे लगता है कि आप इसे यहां प्राप्त कर सकते हैं। शिवाजी पुराने समय के आदर्श हैं। मैं एक नए युग की बात कर रहा हूं। डॉ अंबेडकर से डॉ. यहां तक गडकरी, पवार भी आपको यहां मिल जाएंगे।

मराठीमध्ये वक्तव्य असे शिक्षक विचारायचे तुमचे आवडते नेते कोण आहेत? ज्यांना बोस - नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. जर तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हीरो कोण आहेत? बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. गडकरी पवारांपर्यंत सगळे इथेच मिळतील.

मोदीजी राज्यपालांना राज्यातून बाहेर पाठवा संभाजीराजे छत्रपती राज्यपाल असे का बडबडतात अजूनही समजत नाही. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो की यांना बाहेर पाठवा. महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच बाकी महापुरुषांबद्दल इतकं घाणेरडं बोलूनही कोश्यारी यांना राज्यपालपदी ठेवतात तरी कसे?

औरंगाबादेत याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ३० जुलै २०२२, मुंबई : मुंबई, ठाण्यातील लोकांबाबत मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.

२७ फेब्रु. २०२२, औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
समर्थांविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? समाजात गुरूचे मोठे स्थान आहे. गुरूंना गुरुदक्षिणा दिली पाहिजे.

१४ फेब्रुवारी २०२२, पुणे : सावित्रीबाई फुले यांच्याबाबत
सावित्रीबाई फुलेंचे लग्न १० व्या वर्षी झाले, त्यांचे पती १३ वर्षांचे होते. लहान वयात लग्न झाल्यास मुलगा, मुलगी काय करत असतील?

बातम्या आणखी आहेत...