आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिल्लोडमध्ये आज दोन मॅच होत्या, त्यात पहिली सभा मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे तर दुसरी मॅच पप्पु क्रमांक 2 यांची, ते अंधारात आले आणि अंधारात गेले. त्यांच्या सभेला 500 लोकही राहत नाही असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. ते आज सिल्लोड येथे श्रीकांत शिंदे यांच्या सभेत बोलत होते. राज्यात एकीकडे सत्तार यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन होत असतानाच त्यांची दुसरीकडे टीका सुरूच आहे.
अपमान करायची भावना नव्हती
सत्तार म्हणाले, आज मी जे वक्तव्य केले त्यात मला कोणत्याही पक्षाच्या व्यक्ती, महिलांबद्दल भावना दुखावण्याचे काम करायचे नव्हते. आमच्याकडे जो शब्द वापरले जातात त्याबद्दलही दिलगीरी व्यक्त केली.
हे पहिल्यांदाच घडले
अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदा घडले की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. डाॅ. श्रीकांत शिंदेंनी सिल्लोडमधील शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले.
सत्ता गेल्यानंतर बांध कळला
आदित्य ठाकरेंवर टीका करताना अब्दुल सत्तार म्हणाले, काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी आले. ते अंधारात आले आणि अंधारात गेले. सत्ता गेल्यानंतर यांना शेतीचा बांध समजला. एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी पुण्याचे काम केले. त्यांनी ठाकरेंपेक्षा शिंदेंनी जास्त निधी दिला.
ते चमचाने दुध पिणारे होते
सत्तार म्हणाले, काही लोकांचे पोटशुळ उठत आहे. मुख्यमंत्री शिंदे, आमदारांबद्दल अपशब्द व्यक्त केले जात आहेत. या राज्यासाठी मराठी माणसांसाठी हा उठाव एकनाथ शिंदेंनी केला आहे. सोन्याच्या चमच्यानेच दुध पिणारे मुख्यमंत्री झाले. राज्यातील सामान्य लोकांना एकनाथ शिंदेंच्या रुपात मुख्यमंत्री मिळाला.
आदित्य यांचा पप्पु 2 असा उल्लेख
सत्तार म्हणाले, हजारो लोक जमतात, सिल्लोड सोयगाव मतदारसंघात दोन मॅच आहे. यात पप्पु क्रमांक 2 येत आहेत आणि श्रीकांत शिंदे यांची. पप्पुंच्या सभेला पाचशे लोक राहत नाही. सभागृहालगत महावीर चौकात त्यांनी परवानगी मागितली. पण नंतर ते रणछोडदास बनले.
माथी भडकावू नका
सत्तार म्हणाले, तरुणांना बदनाम करण्याचे काम काही लोक करीत आहेत. तरुणांचे माथे भडकावण्याचे पाप करू नका, आमचे सरकार गोरगरीबांना, शेतकऱ्यांना न्याय देणारे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.