आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन:बाबासाहेबांना राष्ट्रनिर्माता घोषित करण्यासाठी मोहीम ; रात्री 9 वाजेपर्यंत अभियान सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रनिर्माता म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त हे अभियान सुरू केले जाणार आहे. मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलसमोरील हॉटेल मौर्य येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अभियान सुरू राहणार आहे. बुधवारी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बुद्धलेणी परिसरात याच मार्गाने लाखो धम्मबांधव लेणीला तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी जातात. त्यामुळे याच मार्गावर हे अभियान केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...